पोलीस पाटील कै. स्मिता म्हात्रे यांच्या कुटुंबियांना पनवेल तालुका पोलिसांनी केली आर्थिक मदत
सिटी बेल • पनवेल • संजय कदम •
पनवेल तालुक्यातील वावंजे गावात पोलीस पाटील म्हणून कार्यात असलेल्या कै. स्मिता ज्ञानदेव म्हात्रे यांचे नुकतेच देवदर्शनासाठी आपल्या कुटुंबियांसह गेल्या असताना त्यांचे तेथे दुःखद निधन झाल्याने सामाजिक बांधिलकी जपत आज पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली.
वावंजे गावात पोलीस पाटील म्हणून कार्यरत असलेल्या कै. स्मिता ज्ञानदेव म्हात्रे या आपल्या कुटुंबियांसह वैष्णोदेवी येथे देवदर्शनासाठी गेल्या असताना तेथे त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्याचे दुःखद निधन झाले होते.
त्यांनी आत्ता पर्यंत केलेल्या कामाची दखल घेत आज पोलीस पाटील यांच्या बैठकीमध्ये पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे, तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौडकर, पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर, पोलीस उपनिरीक्षक उमेश गुटाळ, गोपनीय विभागाचे सचिन होळकर आदींच्या उपस्थित पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि रवींद्र दौडकर यांनी म्हात्रे कुटुंबियांना पोलीस ठाण्याच्या वतीने आर्थिक मदत केली. त्याच प्रमाणे त्यांच्या मुलाला पुढील शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास त्याला सुद्धा सर्वोतोपरी सहकार्य करू असे आश्वासन वपोनि रवींद्र दौडकर यांनी दिले.








Be First to Comment