Press "Enter" to skip to content

महसुल विभागाशी आर्थिक हितसंबंध ?

रोहा तालुक्यात भालगाव खाडीत वाळू माफियांचे राज्य

सिटी बेल • रोहा • समीर बामुगडे •

रोहा तालुक्यातील भालगाव खाडी पात्रात बेकायदेशी वाळू उपसा सुरु असुन या बांधकामासाठी लागणारी वाळू रायगड जिल्ह्यातील विविध भागातून मोठया प्रमाणात आयात केली जात असुन या वाळूची आवक कमी आणि तसेच वाळू माफियांनी चढया भावाने वाळूची विक्री सुरु केली आहे,अशा वाळु माफियांकडे महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

रायगड जिल्हातील भालगाव ,वावे यशवंतखार या भागातील वाळूला मोठी मागणी आहे,वाळू मागवतात मध्यरात्री व पहाटेच्या सुमारास राजरोजपणे वाळुच्या गाड्या परिसरात दाखल होत असतात वाळूची कुठलीही रॉयटी भरलेली नसते त्यामुळे शासनाचा लाखो रूपयाचा महसूल बुडविला जात आहे.

वाळूची अशा प्रकारे दलाली करणारे कुठल्यातरी राजकीय पक्षाचे नेते असतात त्यामुळे कुठेही शासकीय कारवाई होताना दिसल्यास त्या ठिकाणी आपले राजकीय वजन वापरुन त्या कारवाईवर स्थगिती मिळवतात महसूल विभागातील अधिकारीही कोणाशी दुश्मनी नको म्हणून गप्प बसतात. त्यामुळे वाळू माफिया व महसूल विभागातील काही अधिकारी खुलेआम शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडवीत आहेत असा आरोप स्थानिकाकडुन केला जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.