रायगड़ातील मच्छीमार संस्थेच्या पदाधीकारी यांचे विविध प्रश्न सोडवणुकीसाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री भगवंत खुबा यांना साकडे
कोळी बांधवांच्या अडचणी व त्यांना उद्भभवणाऱ्या समस्या प्राधान्याने सोडविणार
सिटी बेल • पाली/बेणसे • धम्मशील सावंत •
रायगड़ जिल्ह्यासह कोकणातील बहुतांश लोक उदरनिर्वाहासाठी मत्स्यव्यवसायावर अवलंबून आहेत. मात्र आजघड़ीला या घटकासमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. कोळी बांधवांच्या अडचणी व त्यांना उद्भभवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन केंद्रीय पेट्रोलियममंत्री भगवंत खुबा यांनी दिले.
आमदार रमेश दादा, चेतन दादा यांच्या समवेत नवगाव,थळ येथील मच्छीमार संस्थेचे चेअरमन उल्हास वाटकरे, दिलेश चिटके,धनंजय कोळी ,सुधाकर रोगे,गजानन लाकडे,गणपत कोळी, लक्ष्मण सुरकर ,जाया लोंढे ,शिवदास भूडे,रुपम सुरकर यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री भगवंत खुबा यांची नुकतीच भेट घेतली. व समस्यांचा पाढ़ा वाचला. यावेळी केंद्रीय मंत्री खुबा , आरसीएफ़ व्यवस्थापन व मच्छीमार संस्थेचे पदाधिकारी यांच्यात मुंबईत महत्वपूर्ण बैठक पार पडली. त्यावेळी मासेमारी समस्या तातडीने सोडविणार असल्याचे आश्वासन ना. खुबा यांनी दिले.
यावेळी महत्वाच्या प्रश्नावर चर्चा होत सदर आरसीएफ कंपनी मुळे निर्माण झालेल्या समस्या बाबतीत तसेच मच्छिमारांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी विशेष पुढाकार घेऊन समस्या तातडीने सोडण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री खुबा यांनी दिले.सध्या मासेमारी व्यवसाय संकटात आला आहे,त्याची एक ना अनेक कारणे आहेत.अनेक गावातील लोक समुद्रामध्ये पारंपरिक पद्धतीने किंवा छोट्या होडीने मच्छीमारी करून उपजीविका करतात. दरम्यान वातावरणातील बदल, अवेळी वादळी पावसाची हजेरी असे अनेक संकटांतून सामोरे जाऊन मासेमारी दुष्काळ सहन करत असताना त्यामध्ये आता विषारी जेलिफिशने परिसरातील मच्छीमार चिंताग्रस्त झालेत.
सद्या कोळीबांधवांच्या पदरात फायद्यापेक्षा खोट पडत आहे. मासेमारी नौका किनार्यालाच उभ्या असल्याने नोकरांचे पगार, डिझेल, भत्ता खर्च, जाळीखर्च व कर्जाचे थकलेले हप्ते कसे भरायचे असा प्रश्न पडला आहे. जेलिफिश सारखी नैसर्गिक अपत्तीने अनेकांचे व्यवसाय ठप्प आहेत. याबरोबरच आर सी एफ सबंधित अनेक प्रश्न व समस्या आहेत, त्या देखील निकाली काढ़ावेत अशी मागणी यावेळी मत्स्यव्यवसाईक व कोळी बांधवानीं केली. यावेळी मासेमारी समस्या तातडीने सोडवीणार असल्याचे आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री भगवंत खुबा यांनी दिले.








Be First to Comment