महादेव गायकर यांना माजी प्राचार्य एन आर माने निष्ठावंत गुणी रयत सेवक पुरस्कार प्रदान
सिटी बेल • सातारा •
रयत शिक्षण संस्था सातारा यांच्यामार्फत सन 2021-2022 मध्ये देण्यात येणारा माजी प्राचार्य एन आर माने निष्ठावंत गुणी रयत सेवक पुरस्कार 2022 हा परशुराम म्हात्रे विद्यालय नावडे चे शिपाई महादेव नारायण गायकर यांना यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांच्या हस्ते व मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे सचिव प्रिन्सिपल विठ्ठलराव शिवणकर व सहसचिव संजय नागपुरे, मध्य विभाग विभागीय अध्यक्ष महादेव दादा मोहिते, रायगड विभागीय अधिकारी आर.पी. ठाकूर व सहाय्यक विभागीय अधिकारी एस .एस .फडतरे उपस्थित होते .
महादेव गायकर हे अनेक वर्षापासून शालेय कामकाज सांभाळून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत. त्यांच्या या योगदानाने त्यांना अनेक सामाजिक संस्थेमार्फत अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत रयत शिक्षण संस्था मार्फत देण्यात येणारा माजी प्राचार्य एम.आर. माने निष्ठावंत गुणी रयत सेवक पुरस्कार 2022 देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आलेला आहे. आशिया खंडातील नामांकित रयत शिक्षण संस्थेमार्फत मिळालेल्या ह्या पुरस्काराबद्दल त्यांचे समाजातील अनेक स्तरातून कौतुक केले जात आहे.








Be First to Comment