Press "Enter" to skip to content

अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी दिलेले मदतीचे आश्वासन हवेतच विरले…..

लग्नासाठी जमविलेले दागिने दरडीत वाहून गेलेल्या पूजा चव्हाणच्या लग्नाला अभिनेत्री दीपाली भोसले सय्यद यांची मदत मिळाली नाहीच

अखेर पूजाच्या लग्नासाठी निवृत्त पोलिस अधिकारी दिलीप जाधव यांचा पुढाकार

सिटी बेल • रायगड • धम्मशील सावंत •

लग्नासाठी जमविलेले सर्व दागिने दरडीत वाहून गेलेल्या पूजा चव्हाणच्या लग्नाला अभिनेत्री दीपाली भोसले सय्यद यांनी मद्त करणार असल्याचा शब्द दिला होता. मात्र पूजाचा लग्न सोहळा पार पडला, मात्र सय्यद यांच्या कडून तिला कोणतीही मद्त मिळाली नसल्याचे समोर आलेय. अखेर पूजाच्या लग्नासाठी महाड़ येथील निवृत्त पोलीस अधिकारी दिलीप जाधव यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी पूजाच्या संपूर्ण लग्नाचा भार उचलला असून समजापुढे आदर्श उभा केला आहे.

22 जुलै ची भयाण रात्र शेकडो कुटुंबांना उध्वस्त करणारी ठरली. जल प्रकोपाने अनेकांचे संसार मोडून पडले, दरड व महापुरात जिव वाचलेले लोक आता पुढे जगावे की मरावे या विवंचनेत होते. पोलादपूर साखर सुतारवाडी येथील दरडीमध्ये चव्हाण कुटूंबीयांची आयुष्य भरांची पुंजी हीरावुन नेली. चव्हाण कुटुंबाच्या वाट्याला हे दुःख आलं, काबाडकष्ट करून पोटाला चिमटा काढून मोठ्या आशेने मुलीच्या लग्नासाठी दागदागिने केले होते, दरड व महापुराच्या संकटात आपल्या झोपडीत काहीच शिल्लक राहणार नाही याची खात्री असल्याने चव्हाण कुटुंबाने एका सुताराच्या घरी दागिने ठेवण्यास दिले, मात्र ते घर दरडी खाली आले, अन सारे संपून गेले, बाप अपंग असल्याने आता पुन्हा हे दागिने कसे जमविणार, मुलीच्या लग्नाच काय होणार? या विचारांनी अन अश्रूंनी आईच्या मनात घर केलं होत, या संकटात पुन्हा उभे राहण्यासाठी कुणी तरी यावं अन मदतीचा हात दयावा या अपेक्षेत असलेल्या या चव्हाण कुटुंबाला साखर सुतारवाडी या दरडग्रस्त भागात जावून अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी भेट दिली.

पूजाच्या आई वडिलांनी अत्यंत हालअपेष्टा सोसून काबाड कष्ट करून पूजाच्या लग्नासाठी केलेले दागदागिने दरडीत गेले असले तरी तुझ्या संपूर्ण लग्नाची जबाबदारी दीपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्ट घेत असल्याचे त्यांनी यावेळी घोषित केले होते . त्यामुळे चव्हाण कुटुंबियांना खूप मोठा आधार व जगण्यास उमेद मिळाली. मात्र पूजाचे लग्न झाले तरी दीपाली सय्यद यांच्या कडून तिला कोणतीही मद्त मिळाली नसल्याची नाराजी पूजा व पूजाच्या आई वडिलांनी तसेच नातेवाईक यानी व्यक्त केली.

सय्यद यांनी या मुलीच्या लग्नात सर्व मदत करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे आश्वासन दिले होते. दीपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून पूजा चव्हानच्या लग्नातील दागदागिने व संपूर्ण खर्च उचलणार असल्याचा शब्द त्यानी दिला होता. मात्र पूजाच्या लग्नात सय्यद यांच्या कडून कोणत्याही प्रकारची मद्त झाली नाही हेच स्पष्ट झालेय.

यावेळी पूजा चव्हाण व कुटुंबाची परिस्थिती समजल्यावर एक मसीहा मदतीसाठी धाउन आला. निवृत्त पोलिस अधिकारी दिलीप महादेव जाधव यांनी सेवाभावी वृत्तिने पूजाला मुलगी मानुंन तीच्या दाग दागिने व संपुर्ण लग्नाचा भार त्यांनी उचलला. सोन्याचे दागिने, कपड़े, जेवण, मंडप आदि लग्नाचा सम्पूर्ण खर्च उचलला. तसेच वडिलकीच्या नात्याने भविष्यात देखील पूजाच्या खंबिरपने पाठीशी उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले.वर्दीतील माणसाला ही हृदय असते, भावना असतात हे जाधव यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. दिलीप जाधव यांनी अत्यंत प्रेरक व सेवाभावी वृत्तिने काम केले असून त्यांच्या या कृतिने समाजापुढे एक आदर्श उभा राहिला आहे.

गोरगरीब लोक आशेवर जगतात. मुलीचे लग्न हा आई बापासाठी भावनिक क्षण असतो. दीपाली सय्यद यांनी मदतीचा दिलेला शब्द पूर्ण केला नाही, त्यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करताना किमान दिलेला शब्द तरी पाला असे सामाजिक कार्यकर्ते रामदास कळंबे यांनी सांगितले.

पूर्वनियोजित कार्यक्रमा मुळे पूजा चव्हाण च्या लग्नात आशीर्वाद द्यायला येणे जमनार नाही, मात्र तिला मुंबईत बोलवेन, किंवा कोकण दौऱ्यावर असताना जरूर भेटेन. सामूहिक विवाह सोहळ्यात पूजाचे लग्न केले असते.

दीपाली सय्यद, अभिनेत्री

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.