स्मशानभूमी,रस्ता कॉक्रेटिकरण, अंतर्गत भुयारी गटारे या विविध विकास कामाचे भूमिपूजन
सिटी बेल • काशिनाथ जाधव •
पाताळगंगा •
गाव तिथे विकास हे ध्येय साधून ग्रूप ग्राम पंचायत इसांबे यांच्या ग्रामनिधितून विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले.यामध्ये इसांबे,लोहप अदिवासी वाडीतील आर.सी.सी.स्मशानभूमी बांधणे,त्याच बरोबर लोहोप येथील रस्ता सिमेंट काँक्रिट करणे व अंतर्गत गटारे बांधणे अदि विकास कामाचे भूमिपूजन सोहळा ग्रूप ग्राम पंचायत इसांबे सरपंच पल्लवी विकास देवघरे,विकास विष्णू देवघरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
मानवाच्या मृत्यूनंतरचे चिरंस्थान म्हणजे स्मशानभुमी मात्र,गेल्या काही वर्षामध्ये इसांबे,लोहप अदिवासीवाडी येथिल असलेल्या स्मशान भुमिची दुरवस्था निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी नविन स्मशानभुमी बांधण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने ग्रामनिधीतून घेतला.त्याच बरोबर नागरिकांना होत असलेल्या समस्या विचारांतून घेत गाव तेथे गटार असणे गरजेचे आहे.रस्त्यावर पाणी झाल्यास विविध आजार निर्माण होत असतात.मात्र तसे होवू नये यासाठी गटारे समवेत रस्ता कॉक्रेटिकरण करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे.
या विविध विकास कामाच्या भूमिपूजन सोहळ्यास या परिसरातील असंख्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी ग्रामसेवक विजय नलावडे, उपसरपंच अनंता नारायण पाटील, सदस्य,मधुकर शिनगारे,हेमलता देवघरे,रेश्मा पाटील,नामदेव तारू, ताई हिलम,कॉंट्र्क्टर,दर्शन पोळेकर, ग्रामस्थ समीर देवघरे, भरत पाटील,रमेश मुसळे, विष्णू देवघरे(मा. उपरपंच),अनंता देवघरे (पो.पाटील इसांबे), मोहन पाटील (पो.पाटील लोहोप),सोनू वाघे (मा. सरपंच), भरत हिलम,बबन पाटील, हरीचंद्र पाटील, विलास पाटील,शिवाजी पाटील,गणेश पाटील, महेश पाटील,दिलीप जाधव, भगवान सांबरे, गोविंद घारे,सतिष महाब्दि,अर्जुन देवघरे लहु घोंगे, मनोज पाटिल,घारे व ग्रामपंचायत इसांबे कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होते.








Be First to Comment