Press "Enter" to skip to content

कोएसो मेढे विभाग इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिका हेमलता देवकते सेवानिवृत्त

सिटी बेल • नागोठणे • महेश पवार •

नागोठण्यातील रहिवासी व कोएसो मेढे विभाग इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिका हेमलता नानासाहेब देवकते या सुमारे पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मुख्याध्यापिका पदावरून सेवानिवृत्त झाल्या. त्यांचा निरोप व शुभेच्छा समारंभ मेढे शाळेच्या सभागृहात नुकताच संपन्न झाला. यावेळी सत्कारमूर्ती मुख्याध्यापिका देवकते मॅडम यांना शाळेच्या वतीने सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.

यावेळी शाळेचे चेअरमन भगवान गोवर्धने, शाळा समिती सदस्य नंदकुमार दाईटकर, माजी सभापती लक्ष्मण महाले, शाळा समिती सदस्य मोतीराम ठमके, दिपक दाईटकर, माजी सदस्य विलास उंबरे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष नथुराम महाले, आत्माराम घरट, मेढे ग्रामपंचायत सरपंच मयुर खैरे, उपसरपंच रविंद्र जाधव, मेहेंदळे हायस्कूलचे प्राचार्य रमेश मोसे, नानासाहेब देवकते, आरडीसिसी निवृत्त व्यवस्थापिका सुनिता वढावकर, निलिमा राजे, निवृत्त शिक्षक अरुण खामकर, शिक्षिका सीमा भिडे, नातेवाईक एस एस वाघमोडे, बहीण ज्योती वाघमोडे, तनुजा पडसलगी त्याचप्रमाणे सत्कारमूर्ती हेमलता देवकाते यांचे नातेवाईक, कुटुंबीय, मित्रमैत्रिणी, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने संख्येने उपस्थित होते.

यावेळी होळकर सर, नंदकुमार दाईटकर, निवृत्त शिक्षक अरुण खामकर,सत्कारमूर्ती देवकते यांचे नातेवाईक एस.एस.वाघमोडे, मुलगी ऋतुजा देवकते यांनी निवृत्त मुख्याध्यापिका देवकते यांच्यविषयी आपापली मनोगते व्यक्त केली.

यावेळी आपल्या निरोप समारंभाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापिका देवकते म्हणाल्या की, सर्वप्रथम मी कोकण एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष स्वर्गीय दत्ता पाटील उर्फ दादा तसेच आताचे अध्यक्ष संजय भाई पाटील, स्व.प्रभाकर पाटील यांना वंदन करून स्मरण करते. तसेच स्व.अजितभाई शहा, नवनिर्वाचित कार्यवाहक सिद्धार्थ संजय पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक खोपकर तसेच कोएसोच्या संपूर्ण समितीची खूप खूप ऋणी आहे. कारण पाटील कुटुंबीयांनी मला नोकरी दिली, त्यामुळेच मला रोजी-रोटी मिळाली, ओळख मिळाली, नाव मिळाले. त्यांच्यामुळेच शिक्षकी पेशा करत असताना मला माझे अनेक विद्यार्थी डॉक्टर्स, वकील, इंजिनियर, शिक्षक, राजकीय नेते निर्माण करता आले. मला शिक्षिका पदाची व पुढे मुख्याध्यापिका पदाची मला संधी दिल्यामुळे कोकण एज्युकेशन सोसायटीची खूप खूप ऋणी आहे व आनंदी देखील आहे. सर्वप्रथम बापूसाहेब देशपांडे विद्या संकुलात शिक्षकी पेशाला सुरुवात केली. त्यानंतर काही काळ मेहेंदळे हायस्कूल रोहा, पा.म. थरवळ कन्या विद्यालय महाड अशा ठिकाणी तर शेवटी मेढे येथील शाळेत मुख्याध्यापिका पदी सेवा करून मी आज सेवानिवृत्त होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.