कळंबोलीमध्ये जातीय एकोपा नांदण्यासाठी मनसे व मशीद पदाधिकार्यांची पोलिस ठाण्यात बैठक
सिटी बेल • कळंबोली • विकास पाटील •
राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर केलेल्या भाषणात मशिदींवरील भोंगे न काढल्यास मशिदी समोर हनुमान चालीसा लावा असे आदेश आपल्या पदाधिकारीना दिलेत. यानंतर राज्यात जातीयवाद .उफाळून येण्याची चिन्ह दिसत आहेत हिंदू मुस्लिम यांच्यात द्वेष वाढीस लागत आहे. मुंबईच्या कुर्ल्यात मनसे कार्यकर्ते मशिदींसमोर हनुमान चालिसा पठन करणार असल्याचं म्हटलं. काही ठिकाणचे भोंगे देखील उतरवण्याची तयारी सुरू होती. अनेक ठिकाणी मनसैनिक आक्रमक झाले आहेत. याचे पडसाद कळंबोली शहरात उमटू नयेत. शहरात जतिवादाला खतपाणी घालू नये समाजकंटक कडून कोणताही अनुचित घटना घडू नयेत. याबाबत दक्षता घेवून कळंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी मुस्मिम बांधव व मनसे पदाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन केले होते.
कळंबोली मधील मुस्लिम बांधवांनी ईद सणाच्या दिवशी सायंकाळी मशिदींवरील अतिरिक्त भोंगे काढून घेतले. तर सर्वोच न्यायालयाचे आदेशानुसार रात्री 10.00 वा. ते सकाळी 06.00 वा दरम्यान कोणतीही अजाण किंवा प्रार्थना करिता स्पीकर या भोंगे वापरणार नसल्याने व इतर वेळी न्यायालयाने ठरवून दिलेल्या डेसिबल मध्येच स्पीकर लावण्यात येणार असल्याचे सांगितले.
मुस्लिम बांधवानी सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाप्रमाणे आवाजाची मर्यादा ठेवल्याने व अतिरिक्त भोंगे उतरविल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कळंबोलीतील पदाधिकारी अमोल बोचरे, कळंबोली शहर अध्यक्ष राहुल चव्हाण, विधानसभा चिटणीस व इतर पदाधिकारी यांनी आभार व्यक्त केले.
एकमेकांना पुष्पगुछ देऊन कळंबोलीत कोणत्याही प्रकारे जातीय, धार्मिक तेढ निर्माण होणार नाही, एकमेकांशी एकोप्याने राहाणेबाबत पोलिस निरीक्षक संजय पाटील यांनी सूचित केले. सदर वेळ कळंबोली मधील 3 मशीदचे पदाधिकारी व मनसे पदाधिकारी असे 12 ते 14 जण उपस्थित होते.








Be First to Comment