Press "Enter" to skip to content

श्री दुर्ग दुर्गेश्वर रायगड पासून सुरूवात

DR फोर्स महाराष्ट्र आयोजित १ मे महाराष्ट्र दिना पासून महाराष्ट्रात पहिल्यांदा बेमुदत प्लास्टिक मुक्त मोहीम

सिटी बेल • रायगड • अजय शिवकर •

DR फोर्स महाराष्ट्र नेहमीच गड किल्ले यांचे संवर्धन व ऐतिहासिक वास्तूंचे जोपासना कार्य तसेच अनेक उल्लेखनीय सामाजिक कार्य करतात, आताच १ मे महाराष्ट्र दिना पासून श्री दुर्ग दुर्गेश्वर रायगड किल्ल्यावर महाराष्ट्रात पहिल्यांदा
बेमुदत प्लास्टिक मुक्त मोहीम सुरू केली आहे. आज त्याचा पाचवा दिवस आहे ,आतापर्यंत कचऱ्याच्या ७०० गोणी, लाखो बाटल्या गडावरून खाली आणण्यात आल्या आहेत व ही मोहीम अजूनही अविरत चालूच आहे.

ज्या हिरोजीं इंदुलकरांनी आपले पूर्ण अस्तित्व याला घडवण्यासाठी दिले ,ज्याच्या रक्षणासाठी हजारो मावळ्यांनी आपल्या घामाचा आणि रक्ताचा अभिषेक केला.ज्या राजांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण व शेवटचा श्वास आणि आपला देह ज्या ठिकाणी ठेवला आज आपल्याच हातून या पवित्र ठिकाणी प्लास्टिक बॉटल व कचऱ्याचे ढिगारे दिसतात हे पाहून खूप खंत वाटते. चला एकत्र होउन या किल्यांना प्लास्टिक मुक्त करू ! अवघे अवघे यावे, गडकिल्ले स्वच्छ व सुंदर करुनी सोडावे.असे DR फोर्सने या मोहीमेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व तरूणांना आवाहन केले आहे.

या मोहीमेत दुर्ग रक्षक फोर्स संस्थापक अध्यक्ष जयकांत शिंक्रे,स् वराज्य रक्षक वर्षा च.चासकर, दुर्ग रक्षक जोसेफ वेरोनिका लखपती , भारतीय पुरातत्व विभाग सहकारी,सिध्दाई ट्रेकर्स ,दुर्ग मावळा परिवार ,सहयाद्री शिलेदार, शिवराज युवा प्रतिष्ठान,आधार फाउंडेशन परिवार, शिव आज्ञा परिवार, सहयाद्री संजीवनी परिवार, छावा ग्रुप,पेन्स फाउंडेशन संस्था, अनेक इतर संलग्न दुर्ग संवर्धन संस्था व दुर्ग प्रेमी यांनी सहभाग घेतला.

ही मोहीम एक दिवस नसून बेमुदत असेल ,जोपर्यंत गडावरील शेवटचा प्लास्टिक खाली येत नाही तोपर्यंत मोहीम चालू राहील,,म्हणून ज्यांना जसे शक्य होईल यात सामील व्हावे
असे आवाहन केले आहे.
सहभागी होण्यासाठी संपर्क करा ७७६७८७६५६२.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.