सायबर गुन्ह्यांचे पोलिसांपुढे आव्हान ; पाच वर्षात 268 गुन्हे दाखल
सिटी बेल • अलिबाग • अमूलकुमार जैन •
रायगड जिल्ह्यातील वाढती सायबर गुन्हेगारी ही सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच पोलिसांसाठीही डोकेदुखीची ठरत आहे. गेल्या पाच वर्षांतील सायबर गुन्ह्यांची आकडेवारी पाहिली तर 268 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये तेरा कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक झाली आहे.
वाढती सायबर गुन्हेगारी ही सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच पोलिसांसाठीही डोकेदुखीची ठरत आहे. गेल्या पाच वर्षांतील सायबर गुन्ह्यांची आकडेवारी पाहिली तर एकूण268 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे प्रमाण केवळ १७ टक्के आहे. सायबर गुन्ह्यांच्या तपासामध्ये येणाऱ्या अनेक मर्यादांमुळे पोलिसांपुढे हे आव्हान अधिक मोठे होत चालले आहे.
रायगड जिल्ह्यातील २०२०च्या तुलनेत २०२१मध्ये सायबर गुन्हे 49 घडले असून 8782482.7इतकी फसवणूक झाली आहे.
सोशल मीडियावरून होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामध्ये बनावट प्रोफाइल तयार करणे, बदनामीकारक मजकूर टाकणे, अकाउंट हॅक करून अश्लिल पोस्ट टाकणे, खंडणी, अश्लिल व्हिडिओ अपलोड, फोटो मॉर्फिंग, दोन जातींमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट अशाप्रकारच्या गुन्ह्यांच्या सर्वाधिक तक्रार सायबर सेलकडे येत आहेत. गेल्या दीड वर्षांत घडलेल्या सायबर गुन्ह्यांमध्ये सोशल मीडियावरून होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण १६ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे फेसबुकवरून होणाऱ्या गुन्ह्यांच्या तक्रारीचे प्रमाण सर्वाधिक आहे. सोशल मीडियावरील वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
प्रत्येक नागरिकाच्या हातामध्ये मोबाइल व इंटरनेट आले आहे. त्यामुळे सोशल मीडिया वापरणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. परिणामी सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्स अॅप व इतर सोशल मीडियावरून वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे केले जात आहेत.
शहरात मागील काही काळापासून सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून आली आहे. ओटीपीमागवून बॅंकेतून पैसे काढून घेण्याबरोबरच , परदेशी महागडे देण्याच्या बहाण्याने अनेक महिलांची फसवणूक केली आहे. मेट्रोमेनिअल साईटवरून लग्न करण्याच्या बहाण्यानेही फसवणूक झालयाच्या घटनाची नोंद झाली आहे. या सगळया घटनांच्या बरोबर शहर पोलिसांच्या सायबर गुन्हेशाखेत परदेशात नोकरी लावण्याच्या बहाण्याने अनेक तरुणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. सायबर गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार गतवर्षात तब्बल 49 तक्रारी आल्या आहेत. यातील अनेक जणांवर पोलिसांनी वर्षभरात गुन्हे दाखल केले आहेत.
सायबर चोरांच्या फसवणुकीला केवळ जेष्ठ मंडळीच नव्हेतर तर मोठ्या प्रमाणात तरुणाईही फसत आहे. परदेशात नोकरी मिळण्याच्या अमिषापोटी अनेक तरुण- तरुणी गैर मार्गाचा वापर करता असल्याचेही समोर आले आहे. इतकंच नव्हेत सायबर चोरट्यांचे शिकार बनत आहेत. त्यामुळे तरुणांनी सोशल मीडियाच्या, तसेच ऑनलाईन पद्धतीने येणाऱ्या जॉब ऑफर, पैश्याच्या मागणीला खात्री केल्यानंतर, सत्यता पडताळयानंतरच त्याचा स्वीकार करावा. जेणे करून तुमची होणारी फसवणूक थांबेल. गतवर्षात शहारत सायबर गुन्हयाच्या वाढ झाली आहे.
गोल्डन अवर’ महत्त्वाचा
फसवणूक झाल्यापासून वळते केलेले पैसे काढण्यापर्यंतचा कालावधी महत्त्वाचा असतो. अपघाताप्रमाणे सायबर गुन्ह्यामध्ये हा गोल्डन अवर मानला जातो. वळवण्यात आलेले पैसे काढले नसतील तर ज्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आली ती गोठविण्यात येतात. तक्रार करणे, गुन्हा दाखल करणे या प्रक्रियेत वेळ घालविण्यापूर्वी बँक खात्याचा तपशील पोलिसांना द्यायला हवा.
वेळ दवडू नये
आपण सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकलो आहोत, आपली फसवणूक झाली आहे, असे लक्षात आल्यावर वेळ घालवू नका. आर्थिक फसवणुकीत पैसे ट्रान्स्फर होण्यासाठी काही अवधी लागतो आणि हाच वेळ फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे याबाबत जवळचे पोलिस ठाणे, सायबर पोलिस तसेच बँकेशी त्वरित संपर्क साधा. वेळेत तक्रार केल्यास गेलेली रक्कम परत मिळविणे शक्य होऊ शकते.ज्याची फसवणूक झाली आहे त्यांनी तातडीने नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधणे गरजेचे आहे जेणेकरून होणारी फसवणूकीला आळा घालता येईल,असे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी सांगितले.
Be First to Comment