सौ. चित्रा आस्वाद पाटील नेल्सन मंडेला नोबल पीस पुरस्काराने सन्मानित
सिटी बेल • अलिबाग • धनंजय कवठेकर •
पेझारी येथील झेप फाऊंडेशनच्या संस्थापिका तथा रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.चित्रा आस्वाद पाटील यांना नेल्सन मंडेला नोबल पीस पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. खा. छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये झालेल्या बहारदार कार्यक्रमात हा पुरस्कार आणि मानद पदवी बहाल करण्यात आली.
यावेळी दुबईस्थित बु अब्दुल्ला समुहाचे प्रमुख महाराष्ट्र महसुल विभागाचे सह सचिव डॉ.माधव वीर, शेख मजीद रशीद अल मुल्ला.(सत्ताधारी कुटुंब सदस्य संयुक्त अरब अमिराती सामाजिक कल्याण), मा.डॉ.प्रल्हाद भाई दामोदरदास मोदी.(उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ता गुजरात), मा.डॉ.नवदीप सिंग(लंडन, यूके शीख ग्रुपचे संस्थापक), एच.आर.एच.राजकुमारी जॉय पेट्री(जगातील पहिले रॉयल हायपर-रिअलिझम हाताने काढलेले पोर्ट्रेट आर्टिस्ट, दक्षिण आफ्रिका), मा.डॉ.अर्शी झवेरी.(रॉयल फॅमिलीचे वरिष्ठ सल्लागार, UAE अबु धाबी), मा.महाराज सारा अब्बास.(संस्थापक आणि सीईओ¬ इव्हॉल्व्हर इंक.कॅलिफोर्निया, यू.एस.ए), मा.जयश्री राव.(केंद्रीय अन्वेषण ब्यूरो CBI), श्री.करण वर्मा. दुबई, UAE, गायिका. वैशाली सामंत, कु.शिवांशी श्रीवास्तव(व्यवसाय व्यवस्थापन दुबई), मा.कु.अमिषा पटेल.(अभिनेत्री), मा.गुलशन ग्रोव्हर.(अभिनेता), चित्रपट दिग्दर्शक राम शंकर, कुस्तीपट्टू मा. तानाजी जाधव, जेपी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालत डॉ. श्री. जयप्रकाश सिंघानीया, व्यावसायिक प्रदिप जगताप आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सामाजिक, आर्थिक, व्यवसायिक, सांस्कृतिक राजकीय क्रिडा, कला व स्थापत्य या क्षेत्रात देश-विदेष्यातील 1700 लोकांपैकी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 68 जणांना या सोहळ्यात गौरविण्यात आले.
सौ.चित्रा आस्वाद पाटील यांनी झेप फाऊंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो महिलांना रोजगार देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभ राहण्यासाठी मदत केली आहे याची आणि त्यांच्या इतर सामाजिक कार्याची दखल घेत नेल्सन मंडेला पीस अवार्ड अकादमीने सौ.चित्रा पाटील यांची सामाजिक क्षेत्रातील नि:स्वार्थी आणि समर्पित सेवेबद्दल निवड केली आहे. याखेरीज अमेरिकेतील जेबीआर हार्वर्ड मान्यताप्राप्त आणि केम्ब्रिज स्कूल ऑफ डिस्टन्स एज्युकेशनशी संलग्न असणाऱ्या सेंट मदर टेरेसा
युनिव्हर्सिटी फॉर डिजिटल एज्युकेशन एक्सिलन्स सस्टेनेबिलिटी डेव्हलपमेंटतर्फे ‘सामाजिक कार्य’ क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी
देण्यात आली. हा शानदार समारंभ गुरुवारी मुंबईतील सहारा स्टार या हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. नेल्सन मंडेला नोबल पीस अवार्ड अकादमीचे संस्थापकीय अध्यक्ष डॉ. राजकुमार टाक यांनी सर्वांचे स्वागत केले. या वेळी मंचावर खा. छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्यासह नेल्सन मंडेला नोबल पीस अवार्ड अकादमीचे पदाधिकारी उपस्थित होते. सौ.चित्रा पाटील यांना पुरस्कार आणि मानद पदवी मिळाल्यानंतर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment