Press "Enter" to skip to content

खालापुर येथे अश्वारूढ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण

सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •

मावळचे खासदार श्रीरंग बारणे रायगड, जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे ,रायगड जिल्हा माजी उपाध्यक्ष भाई शिंदे यांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला. खालापूर शहरातील चौकात या अगोदर छत्रपतींचा अर्धाकृती पुतळा होता .
याठिकाणी चौकात भव्य असा चौथारा बांधण्यात आला असून त्यावर अतिशय सुंदर सुबक असा शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला आहे.

मोठ्या जल्लोषात पार पडलेल्या अनावरण सोहळ्याला खालापूर नगरपंचायत नगराध्यक्षा रोशना मोडवे, उपनगराध्यक्ष राजेश पारठे, नगरपंचायत विरोधी पक्षनेता संतोष जंगम, शिवसेनेचे नेते विजय पाटील, एकनाथ पिंगळे, उमेश गावंड, अमित जगताप, पद्माकर पाटील, मंदा भोसले ,नगरसेविका लता लोते, उज्वला निधि, सुप्रिया साळुंखे, नगरसेवक किशोर पवार शिवसेनेच्या नगरसेवक नगरसेविका तसेच शिवसैनिक कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.