सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक, विविध क्षेत्रातील शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस पाटील यांनी कोविड काळात उत्तम सेवाकार्य केल्याबद्दल त्यांना आमदार प्रशांतशेठ ठाकूर यांच्या हस्ते कोवीड योध्दाने सन्मानित करण्यात आले.
यावेळी कासप येथील सुजाता किरण माळी यांचे कोरोना काळातील कार्यं उल्लेखनीय असल्याने त्यांना आमदार प्रशांतशेठ ठाकूर यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते.कासप येथील पोलिस पाटील सुजाता किरण माळी यांना कोविड योध्दाने सन्मानित केल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment