Press "Enter" to skip to content

रसायनीकरांकडून स्वागताची जय्यत तयारी !

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा ‘माझा गाव माझी शाखा’ कार्यक्रम

सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •

रसायनीत रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखिल नरेंद्र डवळे यांच्या आग्रहाखातर नुकताच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रसायनीला सदिच्छा भेट दिल्यानंतर युवक काँग्रेस कार्यकर्त्यांत नवचैतन्य संचारले आहे.आणि बुधवार दि.4 मे रोजी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांचे आपटा फाटा येथे सकाळी 9:30 वाजता आगमन होणार असल्याने रसायनी करांनी स्वागताची जय्यत तयारी केली आहे.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी, पुष्पवृष्टी करुन त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात येईल.यानंतर रसायनी पाताळगंगा परिसरातील युवक काँग्रेस पदाधिकारी व सदस्य जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखिल डवले यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड किल्ल्यावर रवाना होतील.

दौ-यादरम्यान रायगड जिल्ह्यात कुणाल राऊत यांचे ठिकठिकाणी स्वागत होवून रायगड किल्ल्यावर महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेऊन महाड येथील ऐतिहासिक चवदार तलावावर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून पुढील दौऱ्याला व माझा गाव माझी शाखा’ या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहेत.अशी माहिती रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निखिल नरेंद्र डवळे यांनी दिली आहे.

दरम्यान कार्यक्रम पुर्वं नियोजन म्हणून युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निखिल डवले, जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सागर सुखदरे,जिल्हा सचिव प्रशांत खाने यांनी रायगड किल्ल्यावर जावून तेथील परिस्थितीची पाहणी करून माहिती घेतली.महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत हे सर्वप्रथम रायगडला भेट देऊन पुढील दौरा सुरू करणार आहेत.महाराष्ट्र युवक काँग्रेसचा हा दौरा एक वेगळा संदेश देणारा व राज्यातील युवकांना प्रेरणा देणारा दौरा असेल असे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निखिल नरेंद्र डवळे यांनी बोलताना सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.