Press "Enter" to skip to content

पत्रकारांशी साधला संवाद

पाली पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी तालुक्यातील अवैध्य धंदे केले बंद

सिटी बेल • पाली/बेणसे • धम्मशील सावंत •

सुधागड तालुक्यातील पाली पोलीस स्थानकात नुकतीच पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे व पत्रकारांची बैठक संपन्न झाली. यावेळी विविध विषय व समस्यांवर चर्चा करण्यात आली. सुधागड तालुक्यातील मटका व्यवसाय व अवैद्य धंदे सर्वप्रथम बंद केले आहेत. शिवाय गावठी दारू निर्मिती व विक्रीवर देखील टाच आणली असल्याची माहिती काईंगडे यांनी यावेळी दिली.

पालीतील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी हटाळेश्वर देवळाजवळ पार्किंग करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच अवजड वाहतुकीवर नियंत्रण आणण्यात यावे असे पत्रकारांनी सांगितले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली जाईल असे काईंगडे यांनी सांगितले. आणि त्यानुसार शनिवारी (दि.30) बेकायदेशीरित्या पार्क केलेल्या मोटारसायकल चालकांवर कारवाई देखील करण्यात आली.

पाली अंबा नदीवरील पुलाचा प्रश्न काईंगडे यांनी सामोपचाराने सोडवला आहे. संबंधित शेतकरी व एमएसआरडीसी प्रशासन यांच्यात समेट घडवून आणली आहे. त्यामुळे पुलातील अडथळा दूर होऊन पुलाचे रखडलेले काम आता सुरू झाले असल्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी सांगितले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जनतेचे देखील चांगले सहकार्य मिळत आहे. असे देखील काईंगडे म्हणाले. यावेळी विविध विषयांवर चर्चा होऊन उपाय सुचविण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.