Press "Enter" to skip to content

पेण नगरपालिकेचे वरिष्ठ लिपिक रविंद्र क्षिरसागर सेवानिवृत्त

सिटी बेल • पेण • वार्ताहर •

पेण नगरपालिकेमध्ये आस्थापनावर काम करणारे वरिष्ठ लिपिक रविंद्र शंकर क्षिरसागर हे आपल्या कारकिर्दीतून नुकतेच पदमुक्त झाल्याने त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले.

अतिशय प्रामाणिकपणा, पारदर्शकता तसेच मन लावून आपले काम करणारे क्षिरसागर यापुर्वी जकात नाका आणि पाणीपुरवठा या विभागात काम केल्यानंतर त्यांना प्रशासकीय चांगला अनुभव असल्याने त्यांची आस्थापनात लिपिक म्हणून बदली करण्यात आली. शासकीय वयोमानानुसार त्यांनी २४ वर्षे ७ महिने काम केल्यानंतर दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजी रविंद्र क्षिरसागर सेवानिवृत्त झाले.

त्यांच्या या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम नगरपालिका सभागृहात मुख्याधिकारी जीवन पाटील, विविध खात्यांचे अधिकारी यांच्यासह पेण तालुका सेवानिवृत्त संघटना उपाध्यक्ष कृष्णा वर्तक यांच्यासह अनेकांनी त्यांचे शाल, श्रीफळ तसेच भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.