सिटी बेल • पनवेल • विजयकुमार जंगम •
सु. ए. सो. चे के. आ. बांठीया मध्यामिक विद्यालय नवीन पनवेल मधील सहाय्यक शिक्षक हनुमान ससर सर यांची वयाची ५८ वर्ष पूर्ण झाल्याने वयोमानानुसार ते सेवा निवृत्त होत असल्याने त्यांचा सेवा निवृत्ती शुभेच्छा समारंभ प्रशासकीय अधिकारी मिलिंद जोशी यांचे अध्यक्षतेखाली के.आ. बांठीया विद्यालयात संपन्न झाला.
सुधागड तालुक्यातील दुर्गम भागातील चिवे गावी एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेले हनुमान ससर सर यांनी पाहिले ते चौथी पर्यंत रा. जि. प. प्रा. शाळा चीवे येथे शिक्षण घेऊन दहावी पर्यंतचे शिक्षण ग.बा. वडेर हायस्कूल येथे कटकसरीत पूर्ण केले. नंतर शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांचे म्हणणे नुसार कमवा व शिका या नुसार पुढील शिक्षणासाठी पुणे येथे जाऊन दररोज रात्री बारा वाजेपर्यंत हॉटेल मध्ये नोकरी करून बी. ए.चे शिक्षण घेतले. नंतर बी.एड.पूर्ण करून शिक्षकी पेशात रुजू झाले. एकच ध्यास गोर, गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करणे शैक्षणिक मदत करणे उद्देश डोळ्यासमोर ठेऊन आज पर्यंत हजारो विद्यार्थ्यांना मदत केली आहे. स्वतःची गरिबीची जान राखत विद्यार्थ्यांना नेहमीच मदतीचा हात दिला आहे.
ससर सर यांच्या पत्नी शर्मिला ससर मॅडम, मुलगी अनुष्का, आणि अनन्या यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ही निवृत्ती नसून मध्यंतर आहे आणि पुढील नवीन जीवनाची खरी सुरुवात असल्याचे सांगितले आहे. हनुमान ससर सर यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ही आपले स्थान उंचावले आहे. विद्यार्थ्यांनी केक कापून घड्याळ भेट देऊन नमस्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत. पी.पी.टी.द्वारे रायगड ओव्ही न्युज चॅनल मार्फत हनुमान ससर सर यांचा जीवनपट विजयकुमार जंगम सर यांनी सादर केला आणि त्यांना फाईव्ह स्टार फॅमिली ग्रुप तर्फे शुभेच्छा दिल्या आहेत.
सु. ए. सो.चे सचिव रविकांत घोसाळकर, प्रशासकीय अधिकारी मिलिंद जोशी, संचालक तथा कळंबोली हायस्कूलचे प्राचार्य राजेंद्र पालवे, प्राचार्य भगवान माळी, म. न. पा. नगरसेवक राजू सोनी, कृष्णा फॉर्म चे मालक प्रशांत लाड, सामाजिक कार्य कर्त्या कळंबे ताई, ह. भ. प. लांबे महाराज, तसेच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी हनुमान ससर सर यांचा जीवन परिचय सांगून त्यांना भावी आयुष्य आनंदी व निरोगी जावे यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजश्री पाटील आणि महेंद्र खडतर यांनी केले तर उपप्राचार्य छगन तिरमले सर यांनी आभरप्रदर्शन करून भावी आयष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.








Be First to Comment