Press "Enter" to skip to content

बॉम्बशोधक व नाशक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत ठोंबरे सेवा निवृत्त

सिटी बेल • नागोठणे • याकूब सय्यद •

पोलिस पथकाचे पोलीस खात्यातील अलिबाग रायगड येथील बॉम्ब शोधक व नाशक (बीडीडीएस) पथकाचे पोलिस उपनिरीक्षक व पोलिस महासंचालक पदकाचे मानकरी सूर्यकांत भगवान ठोंबरे हे महाराष्ट्र पोलिस खात्यात 35 वर्षे निष्कलंक सेवा देऊन निवृत्त झाले आहेत.त्यांचे अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,भेट वस्तु तसेच त्यांच्या पत्नी नीता ठोंबरे यांना साडी भेट देऊन सन्मानीत करण्यात आले.यावेळी सुभाष ठोंबरे,जयाराम पाटील,शुभम ठोंबरे,साहिल ठोंबरे यांच्यासह पोलिस खात्यातील मान्यवर तसेच ठोंबरे यांचे नातेवाईक उपस्थित होते.

सन 1987 रोजी पोलीस दलात भरती झालेले सूर्यकांत ठोंबरे यांचे मूळ गाव अलिबाग तालुक्यातील मिळकतखार असून त्यांनी गेली 35 वर्षे विविध पोलिस ठाण्यात पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हेडकॉन्स्टेबल, ए.एस.आय.,पी.एस.आय. पदावर काम केले आहे. त्यांनी आपल्या सेवेतील कारकीर्दीत विविध माध्यमातून 192 पारितोषिके मिळवली असून त्यांना 2010 साली मा.पोलिस महासंचालक यांचे पोलिस पदकाने सन्मानित करण्यात आले. ते शनिवार 30 एप्रिल रोजी अलिबाग येथील बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या पोलिस ठाणे येथून प्रभारी अधिकारी म्हणून सेवा निवृत्त झाले आहेत.

सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक श्री सूर्यकांत ठोंबरे यांनी सेवानिवृत्त कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना असे सांगितले की 35 वर्षे जनसेवा करण्याची संधी मला मिळाली असून त्यामध्ये निष्कलंक सेवा हेच सर्वात मोठे मला मिळालेले पारितोषिक समजतो. मी आता सेवानिवृत्तीमुळे पोलिस सेवेचा निरोप घेत असून नोकरी करत असताना अनेक कठीण प्रसंग आले.

त्यावेळी मला माझे वरिष्ठांचे मार्गदर्शन व सहका-याचे सहकार्य चांगल्या प्रकारे लाभले. त्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. मी माझ्या सर्व वरिष्ठ, सहकारी व माझे सर्व कुटूंबीय तसेच मित्र परिवार यांचा अत्यंत आभारी व ॠणी असून आपले प्रेम,आस्था,आशीर्वाद,संपर्क सदैव बहरत जावो ही सदिच्छा व्यक्त करीत आहे असे सेवानिवृत्त श्री श्रीकांत ठोंबरे यांनी सेवानिवृत्त कार्यक्रमांमध्ये आपले मनोगत व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.