Press "Enter" to skip to content

आमदार महेंद्र थोरवे यांचा निधी

दाऊदी बोहरा समाजाच्या कब्रस्थानसाठी आमदार फंडातून दहा लाख रुपयांचा निधी

सिटी बेल • कर्जत • संजय गायकवाड •

दाऊदी बोहरा समाजाच्या इफ्तार पार्टीच्या प्रसंगी मुद्रे खुर्द मध्ये असलेल्या कब्रस्थानसाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला.

कर्जत शहरातील दाऊदी बोहरा समाजाच्या प्रार्थना स्थळामध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. प्रार्थना स्थळाचे प्रमुख मुल्ला याह्याजी करीम यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे स्वागत केले.

याप्रसंगी नगरसेवक संकेत भासे उपस्थित होते. शेख हुनेद यांनी प्रस्तविक केले. यावेळी बोलताना आमदार थोरवे यांनी, ‘मी पहिल्यांदाच या ठिकाणी आलो आहे. आपला समाज म्हणजे एकदम नम्र स्वभावाचा समाज. आपण कब्रस्थानसाठी निधी मिळावा अशी मागणी केली होती म्हणून रमजानच्या या पवित्र महिन्याच्या दिवशी आपल्या कब्रस्थानसाठी 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देत असून अजूनही कोणत्याही कामासाठी निधी लागल्यास हक्काने मला सांगा.’ असे स्पष्ट केले. हुसैन जमाली यांनी आभार प्रदर्शन केले. त्यानंतर राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.

याप्रसंगी झुलकरनैन डाभिया, मुल्ला मुर्तझा, अलिभाई धरिवाला,मुस्तफा धरिवाला,शब्बीर धरीवाला, ताहेर कर्जतवाला, मन्सूर बोहरी, शब्बीर कर्जतवाला यांच्यासह जमात कमिटी, दाना कमिटी, एफएमबी कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.