Press "Enter" to skip to content

शेकडो श्री सदस्यांनी केले रक्तदान

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून रक्त दान शिबीर संपन्न

सिटी बेल • काशिनाथ जाधव •
पाताळगंगा •

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र भूषण, व जेष्ठ निरुपणकार डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ.श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.समर्थ मंगल कार्यालय खोपोली येथे रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उल्हास नगर ब्लड बॅंक,१३० तर जे जे हॉस्पिटल मुंबई – ४६५ रक्त दान झाले यावेळी एकूण ५९५ श्री सदस्यांनी रक्त दान केलं.

रक्त सर्वात मोठे दान म्हणजे रक्त दान असून रक्त निर्माण करता येत नाही.मात्र आपण रक्त दान करुन अनेकांचे प्राण वाचवू शकतो.मात्र गेल्या वर्षभरापासून महिन्यापासून अल्प प्रमाणात रक्त दान शिबीर आयोजित करण्यात आले.अपघात किंवा एखादि महामारी निर्माण झाल्यास पेशेंट ला रक्ताची खूप आवश्यकता भासत असते.त्याच बरोबर सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्याचे समजते.मात्र रक्ताची झालेली मोठी पोकळी लगेच भरुन निघणे शक्य नाही. मात्र हातभार लावू शकतो.हे उद्दिष्टे डोळ्यासमोर डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,रेवदंडा यांच्या माध्यमातून हे रक्त दान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

तालुक्यात आता कोरोना नियंत्रणात आल्यामुळे. अनेक तरुण वर्ग श्री सदस्य यांनी सकारात्मक विचार करून रक्तदान करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. कारण प्रत्येकाला जाणीव आहे की आपल्या रक्तादाना मुळे अनेकांचे प्राण वाचले जावू शकतील. या उद्दात विचारांतून रक्तदान मध्ये हातभार लावले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.