Press "Enter" to skip to content

सहा वर्षापासून कालवे पडले बंद

कालव्याची दुरावस्था, शेकडो हेक्टर जमिन नापीक

सिटी बेल • काशिनाथ जाधव •
पाताळगंगा •

तालुक्याच्या ठीकाणी १५ डिसेंबर पर्यंत कालव्याला पाणी येत असते.मात्र खालापुर तालुक्यातील माजगांव, आंबिवली,वारद,पौध तसेच या परीसरातील जोडणा-या आदिवासी वाड्या असून अजुन कालव्याला पाणी न आल्याने शेतक-यांमधुन नाराजीचा सुर उमटत आहे.

या परिसरात शेकडो हेक्टर असून शेतकरी या जमिनितून भाताचे उत्पन्न घेत असतात.परंतू कालव्याचे पाणी नियोजित वेळेवर पोहचत नसल्यामुळे उन्हाळी भात लागवड करण्यास शेतकी वर्गांनी मौन धारण केले आहे.गेल्या तीन चार वर्षापासून कालव्याचे पाणी शेतीपर्यंत पोहचले नाही.शिवाय कालव्यची दुरवस्था यामुळे भात पेरणी पासून ते लागवड पर्यंत पाण्याची खूप आवश्यक असते.मात्र कालव्याची दुरवस्था झाल्यामुळे शेतीला पाणी मिळत नसल्यामुळे या परिसरातील शेतकरी वर्गांनी भात लागवड कडे पाठ फिरविली आहे.

सन २०१६ मध्ये कालव्याला पाणी सोडण्यात आले,मात्र ते शेवट पर्यंत पोहचलेच नसल्यांने मशागतीचा केलेला खर्च वाया गेल्यांने शेतकरी मोठ्या अर्थिक संकटात सापडला होता.यावेळी अनेक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले होते.पाणी येणार या उद्देशाने शेती मशागतीच केली.मात्र कालव्याला पाणी शेवट पर्यंत पोहचत नसल्यांने शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता.उन्हाळी शेती ला पाणी येत असल्याने शेतकरी भात शेतीबरोबर भाजी पाल्याचे उत्पन्न घेत असतात. तसेच गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत असतो. या कालव्याच्या जवळ असलेल्या विहिरी पाणी राहते यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत नाही.

मात्र कालव्याला अवस्था बिकट झाली असल्यामुळे पाणी हवे तेवढे शेतीला मिळत नसल्यांची खंत शेतकरी शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे.कालव्याला पाणी सोडण्याचे म्हटले की साफ सफाई आगोदर करणे गरजेचे आहे.तसेच हा कालवा अंदाजे दहा ते बारा किलो.मिटर असल्यांने हा साफ होण्यासाठी वेळ लागणार,शिवाय हे पाणी सोडण्याच्या लोखंडी पाइप ची अवस्था बिकट झाल्यांने त्या जागी प्लास्टिक चे पाइप टाकण्यात आले आहे.मात्र त्याची ही दुरवस्था निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी नविन लोखंडी पाईप बसविण्यात आले मात्र ज्या ठिकाणी पाणी कालव्यात सोडले जाते.त्यांची सुद्धा दुरावस्था असून, कालव्याला काही ठिकाणी मोठे भगदाड पडेले आहे.

या सर्व बाबीवरुन कालव्याला पाणी शेवटपर्यंत जात नसल्यामुळे कालवा दुरुस्त झाला नसल्यामुळे या वर्षी कालव्याला पाणी आलेच नाही.आहे.सन २०१७ मध्ये पाणी सोडले मात्र ते शेवट पर्यंत पोहचेल नाही.यामुळे कालवा दुरुस्त झाल्याशिवाय पाणी पोहचवू शकत नाही ही वस्तु स्थिती आहे.मात्र सन २०१८ ते २०२० आणी २०२१,२०२२ या वर्षी कालव्याला पाणी सोडण्यात आले नाही.कारण अनेक ठिकाणी कालव्याची दुरावस्था निर्माण झाली आहे. हा कालवा दुरुस्ती साठी ५० लाखाचा निधी गेल्या वर्षी उपलब्ध झाल्याचे समजते.मात्र या वर्षी सुद्धा कालव्याला पाणी का आले नाही. हे शेतकरी यांना न उमगलेले कोडे आहे.

खरसुंडी येथून वाहत येणारा कालवा मात्र,आता पाण्यावाचून कोरडे पडले आहे. कालव्याला पाणी यावे यासाठी मी आणी माझे सहकरी यांनी सातत्याने प्रयत्न केले.मात्र २०१६ नंतर कालव्याला पाणी येणं बंद झाले आहे.या कालवा दुरुस्ती साठी काही निधी उपलब्ध झाल्याचे समजते.मात्र कालव्याचे काम मात्र झाल नाही.या ठिकाणी लोखंडी पाईप नविन टाकण्यात आले.मात्र कालव्याला दुरवस्था आज ही त्याच स्थितीत असल्यामुळे आज शेकडो हेक्टर जमिन नापिक होत चालली आहे. ‌ – कृषी उत्पन्न बाजार समिती खालापूर संचालक, माजी उप सरपंच राजेश पाटील

कालव्याचे पाणी शेतीला आले असते तर शेकडो हेक्टर जमिन नापिक झाली नसती.हे पाणी येत असल्याने गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागत असून काही अल्प भुधारक भाजीपाला लागवड करीत आहे सदर कालव्याला पाणी येत नसल्यामुळे अथिक बजट कोलमडले जात आहे. ‌ – रवी काठावले – शेतकरी माजगांव

कालव्याचे पाणी शेती पर्यंत पोहचत नसल्यामुळे शेतकरी वर्ग शेती करण्यास पाठ फिरवित आहे.शेती केली आणी पाणी आलेच नाहीतर केलेल्या खर्च वाया जाण्याची भिती आहे. त्यातच कालव्याची दुरवस्था निर्माण झाली असल्याचे पाणी शेतीला मिळत नसल्याचे शेतक-याचे म्हणणे. ‌ ‌ – शेतकरी : जयवंत पाटील , माजगांव

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.