Press "Enter" to skip to content

काॅग्रेसच्या कार्यकर्त्यांत संचारला उत्साह

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे कांबे गावात जंगी स्वागत

सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •

राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या एन डी स्टुडिओ येथील भेटी दरम्यान रायगड जिल्हा युवक काँग्रेस व काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या सूचनेनूसार युवक पदाधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव बाळासाहेब थोरात यांनी रसायनी येथील कांबे गावात सदिच्छा भेट दिली.

रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष निखिल डवळे व युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रशांत गायकवाड यांच्या निवासस्थानी भेट दिली.स्टुडिओपासून कांबे येथे मोटारीने येत असताना रायगड जिल्हा युवक काँग्रेस सचिव प्रशांत खाने व सागर सुखदरे यांनी दांडफाटा पासून रसायनी परिसरातील माजी सभापती कांचन पारंगे व खालापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष माजी सरपंच कृष्णा पारंगे यांच्यामार्फत झालेल्या विकास कामांची माहिती महसूलमंत्री थोरात यांना दिली.

यावेळी निखिल डवळे यांच्या निवासस्थानी जल्लोषात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्वागत करण्यात आले.यानंतर युवक काँग्रेसचे प्रशांत प्रकाश गायकवाड यांच्या निवास्थानी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सदिच्छा भेट दिली.यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी प्रांताधिकारी अजित नैराले ,तहसीलदार आयुब तांबोळी,रायगड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष श्रद्धा ठाकूर,रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर,युवक काँग्रेसचे प्रशांत गायकवाड ,माजी सरपंच अशोकभाऊ मुंढे,माजी सरपंच कृष्णा पारंगे,माजी पंचायत समिती सदस्य कांचन पारंगे,सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाशशेठ गायकवाड,दिपाली म्हात्रे, किरीट पाटील, दीप्ती म्हात्रे ,देविदास म्हात्रे, विनायक डवळे,संजय कांबळे प्रतीक पाटील, श्याम म्हस्कर, अक्षय मुंढे,सुरज पाटील ,संदेश डवळे, गणेश मित्र मंडळाचे सदस्य व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.