Press "Enter" to skip to content

खोपोली येथील हिंदु राष्ट्रजागृती सभेत धर्माभिमानी हिंदू एकवटले !

भारत हिंदु राष्ट्र होण्यासाठी हिंदूंनी त्याग नाही केला, तर हिंदूंचे अस्तित्त्वच धोक्यात येऊ शकते ! :- अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सिटी बेल • गोवे-कोलाड • विश्वास निकम •

गेल्या ८ वर्षांत राम मंदिर निकाल, ३७० कलम आणि तिहेरी तलाक रहीत करणे अशा अनेक गोष्टी आपल्या समोर आल्या, मात्र ‘भारत हिंदु राष्ट्र घोषित करणे’ हे समस्त हिंदू बांधव, हिंदु संघटना आणि हिंदू नेते यांच्यापुढे एक मोठे आव्हान आहे. २०६१ साली भारतात हिंदू अल्पसंख्याक होणार आहे ! पृथ्वीच्या पटलावर ‘हिंदू’ अगोदरच अल्पसंख्याक आहे. आपल्या एका पिढीने बलिदान दिले म्हणून आपण स्वतंत्र भारतात जगू शकत आहोत. आजही वेळ अशी आली आहे की, भारत हिंदु राष्ट्र होण्यासाठी हिंदूंनी त्याग नाही केला तर हिंदूंचे अस्तित्त्वच धोक्यात येऊ शकते ! हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी संघटनशक्तीची आवश्यकता आहे, त्यासाठी समस्त हिंदू बांधवांसह हिंदू संघटनांनी सर्व बिरूदावले बाजूला ठेऊन एकत्र यायला हवे आणि वैध मार्गाने लढा द्यायला हवा, असे आवाहन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक अभय वर्तक यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित खोपोली येथील समर्थ कृपा ग्रीन हाऊस सभागृह येथे पार पाडलेल्या हिंदु राष्ट्र जागृती सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या सभेला सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरू (सुश्री) अनुराधा वाडेकर, सनातन संस्थेच्या संत पू. (सौ.) संगीता जाधव, रायगड भूषण ह.भ.प. रामदास भाई पाटील महाराज, रायगड भूषण ह.भ.प. काशिनाथ पारठे यांची वंदनीय उपस्थिती लाभली. खोपोली नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अमोल जाधव आणि दिलीप जाधव, शिवसेनेचे शाखाप्रमुख विलास बारस्कर, स्वराज्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रमोद शिर्के, उंबरे ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच समीर पांगारे, शिवसेनेचे खोपोली उपशहरप्रमुख संदीप पाटील आदी आदी विविध क्षेत्रातील तसेच धार्मिक आणि आध्यत्मिक क्षेत्रातील मान्यवरांसह शेकडो धर्माभिमानी हिंदू या सभेला उपस्थित होते. या सभेतून प्रेरणा घेऊन रायगड जिल्ह्यातील खोपोलीच्या नजीकच्या गावागावांमध्ये अशा हिंदु राष्ट्र जागृती सभा घेण्याची सिध्दता उपस्थित धर्मप्रेमींनी दर्शविली.

हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके या सभेत संबोधित करताना म्हणाले, ‘छत्रपति शिवाजी महाराजांच्या पावनभूमी असलेल्या रायगड जिल्ह्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर होत आहे. देशभरात लव्ह जिहाद, मंदिरांची तोडफोड, हिंदूंच्या मिरवणूकांवर आक्रमणे, हलाल सर्टीफिकेटच्या माध्यमातून निर्माण केलेली समांतर अर्थव्यवस्था यासारख्या अनेक समस्यांना हिंदूंना तोंड द्यावे लागत आहे. या सर्व समस्यांवर हिंदु राष्ट्रच हाच उपाय असून या कार्यात सक्रीयपणे योगदान देऊया’.
सभेचा प्रारंभ शंखनादाने झाला.

तदनंतर रायगड भूषण ह.भ.प. रामदास भाई पाटील महाराज यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले, त्यानंतर त्यांनी व्यासपीठावरील विराजमान छत्रपति शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यानंतर वेदमंत्रपठण संपन्न झाले. उपस्थित संतांचा सन्मान आणि मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे देशभरात चालू असलेल्या व्यापक कार्याविषयी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हा समन्वयक श्री. सागर चोपदार यांनी सांगितले. हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेऊन या सभेची सांगता करण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.