Press "Enter" to skip to content

आदिवासी समाज संघटनेची घोषणा

हुतात्मा नाग्या कातकरी आदिवासी भवन परळी सुधागड च्या वाचनालयास अनुसया राजाराम सोनावणे यांचे नाव

सिटी बेल • रायगड़ • धम्मशील सावंत •

दिवंगत अनुसया राजाराम सोनावणे यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम रुद्रवली येथे सोमवार दि.(2) रोजी वैचारिक व लोकोपयोगी उपक्रमांसह पार पडला. यावेळी उपस्थितांना परिवर्तन वादी व पुरोगामी विचारधारेचे असंख्य ग्रंथ वाटप करून समाजात आदर्शवत व प्रेरक संदेश देण्यात आला.

परळी येथे अत्यंत भव्य व सुसज्य असे हुतात्मा नाग्या कातकरी आदिवासी समाज भवन उभारले असून याठिकाणी डॉ. संजय राजाराम सोनावणे यांच्या योगदानातून वाचनालय साकारत आहे. या वाचनालयास दिवंगत अनुसया राजाराम सोनावणे यांचे नाव परळी जांभुळपाडा विभाग आदिवासी कातकरी समाज संघटनेचे अध्यक्ष रमेश पवार यांनी सर्वांच्या मते जाहीर केले.

हे वाचनालय अत्यंत सुसज्य व अनेक ग्रंथसंपदेने परिपुर्ण असणार आहे. शिवाय हे भवन केवळ इमारतीची वास्तू नसून हे भवन सामाजिक व शैक्षणिक चळवळीचे केंद्रबिंदू ठरेल . तसेच येथून रोजगारनिर्मिती चे धडे दिले जातील, तसेच मार्गदर्शन केंद्र , महिला सक्षमीकरण होणेंबरोबर शासनाच्या विविधांगी योजना व उपक्रम याठिकानातून राबविले जातील असे रमेश पवार म्हणाले.

यावेळी डॉ. संजय सोनावणे म्हणाले की, आदिवासी कातकरी समाजाच्या अनेक पिढ्या हे दारिद्र्याचे चटके सोसत आल्या आहेत. याचे कारण अज्ञान व निरक्षरता असून हा समाज डिजिटल इंडियापासून दूर आहे, मूलभूत व पायाभूत नागरी सेवासुविधांपासून वंचित आहे.

शासनाच्या विविध योजना या लाभार्थी घटकांपर्यंत पोहचत नाहीत, हा समाज भविष्याची चिंता करीत नाही , त्यामुळे यांचे भविष्य अंधारमय आहे. आता परिस्थिती काहीअंशी बदलत आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेला घटक आता सर्वांगीण दृष्ट्या विकास व प्रगती साधताना दिसतोय. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेले हक्क व अधिकाराची जाणीव या घटकाला झाली असून शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या आपण देखील प्रगतीपथावर असावे या विचाराने आता आदिवासी कातकरी ठाकूर समाज शिक्षणाकडे वळतोय.

शिक्षणाने सुसंस्कृत पणा येतो, तसेच ज्ञान कक्षा रुंदावतात, शिकाल तरच टिकाल आणि वाचाल तरच वाचाल अशी स्थिती आज निर्माण झालेय, आज आदिवासी समाज प्रगती साधू पाहतोय, ज्ञान व वाचनाने वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ होतोय. आदिवासी कातकरी समाज प्रगतीपथावर गेलेला पहायला आवडेल, रमेश पवार सारखे सुशिक्षित तरुण आता समाज उन्नतीच्या दिशेने नेण्यासाठी धडपडताना दिसत आहेत.

आदिवासी कातकरी बांधवानी वाचनालय निर्मितीसाठी पुढाकार घेतला हे कार्य संबंध जिल्ह्यात राज्यात प्रेरणादायी ठरेल असेच आहे. या ग्रंथालयाचा जास्तीत जास्त उपयोग करून होतकरू व विद्यार्थी वर्गाला वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ व सशक्त बनविण्यासाठी केला पाहिजे. असे आवाहन डॉ.सोनावणे यांनी केले. समाजसेवेचे व्रत सोनावणे कुटुंबियांनी घेतले असून आम्ही कमविलेला पैसा थप्पी लावून ठेवायचा नसून समाजहित व राष्ट्रहितासाठी खर्ची व्हावा याउद्देशाने आम्ही काम करतोय. समाज जागृत व प्रगतीपथावर नेणे कामी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे डॉ.संजय सोनावणे यांनी सांगितले. या वाचनालयाचे नाव अनुसया राजाराम सोनावणे असल्याची घोषणा समाज संघटनेने केली त्याबद्दल सर्वांचे आभार व उपस्थितांचे ऋण व्यक्त करीत असल्याचे डॉ.सोनावणे म्हणाले.

यावेळी लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचे राज्याध्यक्ष, नामवंत उद्योजक ज्येष्ठ समाजसेवक डॉ. संजय सोनावणे, सौ.सुनीता सोनावणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदेव राव,तसेच
सभापती अंकुश सकपाळ, सुनीता संजय सोनावणे, निलेश सोनावणे, प्रदीप सोनावणे, शरद सोनावणे, सतीश सोनावणे, अनिल भातनकर,राजेश सोनावणे, संतोष सोनावणे, बौद्धचार्य साऊनंद साळवी, अनिल तांबे, दीपक शिंदे, रवींद्र गायकवाड, अपेक्षा अनिल तांबे, दीप्ती दीपक शिंदे, शर्मिला सोनावणे, संगीता श्रीधर सोनावणे, श्रीधर सोनावणे, मनीषा सोनावणे, भारती सोनावणे, मनोहर कांबळे,पत्रकार धम्मशील सावंत,गौतम जाधव, अखिल भारतीय आदिवासी सामाजिक संघटनेचे कोकण संघटक रमेश पवार, सखाराम घोगरकर, उपसरपंच चंद्रकांत जाधव, सखाराम जाधव, सुधाकर पालकर, बौद्धचार्य बाजीराव गायकवाड, संतोष मोरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.