Press "Enter" to skip to content

रायगडातील 6 योजनांसाठी 114 कोटींचा निधी होणार खर्च

काचली पिटकिरी खारभुमीच्या कामात भ्रष्टाचार ; अंदाज समितीने खारभूमीच्या अधिकाऱ्यांना झापले

सिटी बेल • पेण • वार्ताहर •

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत रायगड जिल्ह्यातील 6 योजनांसाठी 114 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येत आहे. यातील अलिबाग तालुक्यातील काचली – पिटकीरी योजनेच्या बंधाऱ्याला विधीमंडळाच्या अंदाज समितीने भेट दिल्यावर खारभूमी विभागाचा गळथान कारभारावर सदस्यांनी खारभूमीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच झापले व सदर कामाची चौकशी करण्यात येईल असे सांगण्यात आले.

यावेळी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी खारभूमी विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे येथील पिकती भात शेती कशी नष्ट होत आली असल्याचा पाढा त्यांनी आलेल्या समितीसमोर वाचला मागील दोन वर्षापासून 6 किलोमीटर लांबीच्या काचली – पिटकरी खारभूमी बंधाऱ्याचे काम सुरु आहे.मात्र या कामात अधिकारी वर्गाने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करीत असल्याने शेतकऱ्यांनी यासाठी अनेकदा आंदोलन केले. मात्र या बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले पाहून आजही उधाणाचे पाणी थेट पिकत्या भात शेतीत जाऊन नुकसान होत आहे.

नुकताच रायगड जिल्ह्यात आलेली आ. रणजीत कांबळे यांच्या अध्यक्षतेखालील विधिमंडळाची अंदाज समितीच्या दौऱ्यावरील समितीने बुधवारी अलिबाग येथील कामकाजाची चौकशी केल्यानंतर कामांची पाहणी केली असता काचली – पिकटरी खारभूमी योजनेला भेट दिली असता खारभूमीच्या अधिकाऱ्यांच्या गळथान कारभाराचा पाढाच समिती सदस्यांसमोर शेतकऱ्यांनी वाचला.

6 किमी लांबीच्या काचळी – पिटकीरी खारभूमी योजनेसाठी 20 कोटी 59 लाख रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यातून 334 हेक्टर जमीन पुन्हा पिकाखाली येईल असे खारभूमीचे अधिकारी सांगत आहेत.मात्र त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देताना खारजमीनीला समुद्राच्या खार्‍या पाण्यापासून संरक्षण लवकरच मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.