जिल्ह्यातील मध्यवर्ती नागोठणे बसस्थानकाचा होणार कायापालट : दोन कोटी रुपयांचा निधी मंजुर
नागोठणे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : आमदार तटकरे
सिटी बेल • नागोठणे • महेश पवार •
रायगड जिल्ह्यातील महत्वाचे व मध्यवर्ती एस.टी. स्थानक असूनही गेली अनेक वर्षे दुर्लक्षित व दुरावस्था झालेल्या नागोठणे एस.टी. स्थानकासाठी दोन कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे स्थानकाचा कायापालट होऊन स्थानक सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज होणार आहे. विधानपरिषदेचे आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी याप्रकरणी केलेल्या पाठपुराव्यामुळेच हे शक्य झाले असून यापुढेही नागोठणे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे अभिवचन आ. तटकरे यांनी दिले आहे.
नागोठणे शहरातील एस.टी बसस्थानकाची दयनीय अवस्था झाल्याने त्याकडे आपण जातीने लक्ष घालावे अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते भाई टके व सहका-यांनी कार्यतत्पर आमदार अनिकेतभाई तटकरे यांना केली होती. त्यानंतर आमदार तटकरे यांनी नागोठणे एसटी बसस्थानकाच्या दुरावस्थेबाबत परिवहन मंत्री ना. अॅड. अनिल परब व उपमुख्यमंत्री तथा राज्य परिवहन विभागाचे महाव्यवस्थापक ना. अजितदादा पवार यांना एका निवेदना द्वारे निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. यासाठी आ. तटकरे यांनी सतत पाठपुरावाही केला होता. अखेर आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या पाठपुराव्याला यश आले असुन नागोठणे एसटी बसस्थानकाची नव्याने बांधकाम करण्यासाठी दोन कोटी रुपये निधी मंजुर करण्यात आला आहे. या निधीस प्रशासकीय मान्यताही मिळाली असल्याने आता लवकरच नागोठणे एसटी बसस्थानक सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज होणार आहे. त्यामुळे नागोठणेकर नागरिक तसेच प्रवासी वर्गाकडून आमदार अनिकेतभाई तटकरे यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
दरम्यान नागोठणे शहर व विभागातील विकासकामांसाठी आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी सव्वादोन कोटी रुपयांंचा निधी उपलब्ध करून देऊन त्या विकासकामांचे नुकतेच लोकार्पन व भुमीपुजन केल्याने नागोठणे शहर व विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे कृतीतून दाखवुन दिले होते. असे असतांनाच आता नागोठण्यातील सर्व प्रवाशांसाठी महत्वाचा विषय असलेल्या नागोठणे एसटी बसस्थानकाच्या नव्याने करण्यात येणाऱ्या बांधकामासाठी लागणाऱ्या या निधीचे प्रशासकीय मान्यता पत्र शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पेण येथील जनसंपर्क कार्यालयात नागोठणे येथील कार्यकर्त्यांना आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी दिल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यावेळी नागोठणे विभागीय नेते भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, उदय जवके, विलास चौलकर, संतोषभाई कोळी, बाळासाहेब टके, सचिन कळसकर, विनय गोळे, दिपेंद्र अवाद, अखलाक पानसरे, कुणाल तेरडे, रोशन पारंगे, दिनेश घाग, रविंद्र वाजे, कादिर रिफाई तसेच पेण तालुका अध्यक्ष दयानंद भगत, जिल्हा सरचिटणीस परशुराम मोकल, पेण विधानसभा मतदार संघ अध्यक्ष नरेंद्र ठाकुर, शहर अध्यक्ष जितेंद्र ठाकुर, पाली नगराध्यक्षा गीताताई पालरेचा, पेण माजी नगराध्यक्ष संतोष शुंगारपुरे, प्रभाकर लांगी आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार अनिकेतभाई तटकरेंचे काय होते निवेदन
ना. परब व ना. पवार यांना दिलेल्या निवेदनात आमदार अनिकेतभाई तटकरेंनी म्हटले आहे की, माझ्या मतदार संघातील नागोठणे (ता. रोहा) येथील एसटी बसस्थानककाचे तौक्ते चक्रीवादळामुळे मोठया प्रमाणात नुकसान झालेले असुन ते अत्यंत धोकादायक बनले आहे. त्यामुळे नागोठणे एसटी बसस्थानिकाची नव्याने बांधकाम करण्याची गरज निर्माण झाली आहे. तरी कृपया प्रशासकीय पूर्तता करून तात्काळ निधी उपलब्ध करून नागोठणे एसटी बसस्थानकाची नव्याने बांधकाम करून नविन स्वरूपात उभारण्याकरिता प्रशासकीय मान्यता तथा निधी उपलब्ध करून देण्यात यावी अशी विनंती आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी निवेदना द्वारे केली होती. त्यानुसार नागोठणे एसटी बसस्थानकाची नव्याने बांधकाम करण्यासाठी २ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.








Be First to Comment