Press "Enter" to skip to content

चौक बाजारपेठेतील मेडिकलला आग : लाखोंचे नुकसान

सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •

चौक बाजारपेठेतील पराग ठाकूर यांचे विद्या मेडिकल नावाचे औषधांचे दुकान आहे.या दुकानाला पहाटे चारच्या दरम्यान शॉर्ट सर्किटने आग लागली.

रस्त्याच्या पलीकडे शेजारी राहणा-यांना त्यांच्या खिडकीतून दुकानातून धूर येताना दिसला,त्यामुळे त्यांनी मेडिकल दुकानात काम करणारे अरुण यांना भ्रमणध्वनी वरून माहिती दिली.त्यांनी त्यांचे सहकारी नरेश यांना भ्रमणध्वनी वरून सांगितले. अरुण हे दुकानात आल्यावर त्यांनी दुकानाचे शटर उघडले तेंव्हा त्यांना फ्रीझ जळताना दिसला. शटर पूर्ण उघडल्यावर आगीने रौद्ररूप धारण केले.

मेडिकल दुकानात असलेले पॅमपर्स व सॅनिटरी नॅपकिन यांनी त्वरित आग पकडल्याने आगीचा भडका उडाला‌. छताला असलेला सिलिंग फॅन,दोन संगणक,औषधांची कपाटे जळून खाक झाली, तर औषधांच्या बाटल्या यांचा स्फोट होत होता.

चौक बाजारपेठेमधील शेजारी ग्रामस्थांनी अग्निशमन दलाला पाचारण करून घरातली पाणी आणून आग आटोक्यात आणण्यासाठी सशर्त प्रयत्न केले. अग्निशमन दल येईपर्यंत बेचिराख झाली होती.यात जवळपास अंदाजे पस्तीस लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.दुकानाच्या बाहेर आगीने येण्याचा प्रयत्न केला होता. सराफ याच्या शटरला थोडे नुकसान झाले. मेडिकल दुकानाच्या बाजूला सोन्याची पेढी, कपड्याचे दुकान,मिठाई चे दुकान,पार्लर,पतपेढी कार्यालय आहे.मिठाईचेच्या दुकानात गॅस सिलेंडर होते. यामुळे सर्वच दुकाने आगीच्या जाळ्यात सापडली असती.

चौकचे सपोनि.युवराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोह.सचिन व्हसकोटी पुढील तपास करीत आहेत.चौक बाजारपेठ मध्ये रस्ता दुरुस्ती चे काम सुरू आहे. रस्ता रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव मागील चार वर्षांपासून पडून आहे,त्याला प्रशासकीय मान्यता व आर्थिक तरतूद असूनही काही नेत्यांच्या व काही ग्रामस्थांच्या अडेलतट्टू पणामुळे रुंदीकरण होत नाही. रस्ता रुंदीकरण होणे किती आवश्यक आहे हे आजच्या आगीने दाखवले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.