सिटी बेल • नागोठणे • महेश पवार •
नागोठण्याजवळील ग्रुप ग्रामपंचायत कोडंगाव (ता. रोहा) हद्दीतील
आदिवासी वाड्यांवर १५ टक्के मागासवर्गीय निधीतून भांडी व खुर्च्या वाटप करण्याचा कार्यक्रम नुकताच कोंडगाव ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाला.

यामध्ये कातलावाडी येथील वैयक्तिक लाभार्थ्यांना खुर्च्या वाटप करण्यात आले. तर एकलघर, पायरवाडी, भपक्याची वाडी व कोंडगाव आदिवासी वाडीतील आदिवासी बांधवांना सार्वजनिक वापराची भांडी वाटप करण्यात आले.
यावेळी कोंडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच कमल बुरुमकर, उपसरपंच अनंत वाघ, माजी सरपंच तथा सदस्य निखील मढवी, यशवंत शिद, सदस्या प्रणाली मढवी, ग्रामसेविका विद्या घरत व ग्रामस्थ उपस्थित होते.








Be First to Comment