भारतीय श्रमिक शक्ती संघ युनियनच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार : आमदार महेंद्रशेठ दळवी
सिटी बेल • नागोठणे • महेश पवार •
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नागोठणे युनिटमध्ये कार्यरत झालेल्या भारतीय श्रमिक शक्ती संघ युनियन या कामगार संघटनेच्या व संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत आमदार म्हणून मी ठामपणे उभा राहणार आहे असे रोखठोक वक्तव्य करीत अलिबाग-मुरूडचे आमदार तथा रायगड जिल्हा शिवसेनाप्रमुख आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी भारतीय श्रमिक शक्ती संघ युनियनला भक्कम पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
भारतीय श्रमिक शक्ती संघ रिलायन्स नागोठणे युनिट युनियनच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा व मार्गदर्शन करण्यासाठी अलिबाग जवळील राजमाळा येथील श्रीराज निवास येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार दळवी बोलत होते.
आ. दळवी पुढे म्हणाले की, रिलायन्स कर्मचारी तसेच चोळे ते वरवठणे या प्रकल्पग्रस्त बाधित गावांतील सुशिक्षित बेरोजगार तसेच असंघटित कामगारांना न्याय देण्यासाठी मी आपल्या युनियनच्या सोबत सदैव राहणार आहे. पुढील काळात कामगारांवर अन्याय झाल्यास गाठ माझ्याशी आहे हे व्यवस्थापनाने लक्षात घ्यावे. आपली कंपनी अधिक उत्पन्न घेऊन प्रगती पथावर जाणार यासाठी आपण कामगार म्हणून मोठे योगदान देणे हे सुध्दा कामगार म्हणून आपले कर्तव्य पार पडणे गरजेचे असल्याचा मोलाचा सल्लाही यावेळी आ. दळवी यांनी युनियन पदाधिकाऱ्यांना दिला. कंपनीत निवृत्त कर्मचाऱ्यांच्या जाग्यावर परिसरातील उच्च विद्याविभूषित तरुणांना नोकरी द्यावी असेही ते शेवटी म्हणाले.
यावेळी कामगार नेते दिपकभाई रानवडे म्हणाले की, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठण्याचे युनिट मधील कामगार समस्या अनेक आहेत. परंतु भारतीय श्रमिक शक्ती संघ युनियनच्या रूपाने मी तुमच्या सोबत राहून आपल्या मागण्यांबाबत सतत पाठपुरावा करून कामगारांना न्याय देईन.
याप्रसंगी भारतीय श्रमिक शक्ती संघचे नागोठणे युनिट अध्यक्ष निलेश नाईक, जनरल सेक्रेटरी प्रमोद मोरे, कार्याध्यक्ष अशोक भोय उपाध्यक्ष चंद्रकांत अडसुळे, प्रविण दबडे, किशोर शिर्के, संजय काकडे, विनोद गोरे, मनोज पेढवी, गणपत खाडे, दिनेश शिर्के, सुरेश गायकर, शांताराम भोई, अजय घरत, पंडित तुपकर, सुभाष म्हात्रे, संदेश अडसुळे, महादू लाडगे, अजिम बेणसेकर, अस्लम चोगळे, दिपक महाडेश्वर, अनिल जांभेकर, निलेश म्हात्रे, अजित घरत, सुभाष वर्तक, भारती सिंगासने, अनुजा म्हात्रे, संतोष भगत, संजय गायकवाड, नरहरी शेवतकर, विजय गावंड आदि युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रथम युनियनच्या वतीने आमदार महेंद्रशेठ दळवी यांचे युनियनच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आले. या नंतर चंद्रकांत अडसुळे, प्रमोद मोरे, अशोक भोय, किशोर शिर्के, अस्लम चोगळे, दिनेश शिर्के, भारती सिंगासने यांनी कामगारांच्या समस्या आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्यासमोर मांडल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सुभाष खराडे यांनी केले.
Be First to Comment