Press "Enter" to skip to content

शासकीय अध्यापक महाविद्यालयामध्ये पदवीदान समारंभ

सिटी बेल • पनवेल • विजयकुमार जंगम •

शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल येथे मोठ्या उत्‍साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमूख पाहुणे म्हणून सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज, मुंबई येथील मा. प्राचार्या डॉ. मसरत अली साहेब उपस्थित होत्या.

प्रमूख पाहुण्यांचे स्वागत लेझीम नृत्य, तारपा नृत्याने केले गेले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक या महाविद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. नीलीमा अरविंद मोरे यांनी केले पाहुण्यांचा परिचय या महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. बी. जी. खाडे यांनी केले. या प्रसंगी या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुविद्या महेश सरवणकरांनी विद्यार्थ्यांना शिक्षण म्हणजे काय ? हे समजावून सांगितले, त्यांनी या प्रसंगी अब्राहम लिंकन यांनी मुख्याध्यापकास लिहिलेले पत्र वाचून दाखविले.

शेवटी पदवीसाठी उपस्थित राहिलेल्या छात्राध्यापकांकडून शपथ घेतली गेली. प्रमुख पाहुण्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा आदर्श सर्व विद्यार्थ्यांनी ठेवावा असे आवाहन केले. तसेच शिक्षण घेण्याची खरोखरच मनापासून जर इच्‍छा असेल तर कोणतेही संकट हे मोठ नसत त्यातून मार्ग हा 100% निघतो फक्त त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा आवश्यक आहे असे सांगितले. या प्रसंगी शैक्षणिक वर्ष 2019-21 च्या बी. एङ आणि एम एङ च्या छात्राध्यापकांनी पदवी घेण्यासाठी उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु. ऋतुजा हेलवाडे यांनी केले असून आभारप्रदर्शन प्रा. बिजली दडपे मॅडम यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी डॉ. नीलीमा अरविंद मोरे यांनी स्विकारली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.