Press "Enter" to skip to content

गतीरोधक बनले धोकादायक

जिंदाल कंपनीच्या समोरील अतिउंच गतिरोधकामुळे अपघाताचा धोका
धोकादायक गतिरोधक हटविण्याची मागणी

सिटी बेल • नागोठणे • महेश पवार •

महामार्गावर नागोठणे ते कोलाड या दरम्यानच्या अंतरामध्ये अनेक ठिकाणी मोठ मोठे गतिरोधक टाकण्यात आले आहेत. यापैकी सुकेळी येथील जिंदाल कंपनीच्या समोरच असलेल्या गतिरोधकाची उंची क्षमतेपेक्षा जास्त असल्याने तसेच तदयावरील पांढ-या रंगाचे पट्टे स्पष्ट दिसत नसल्यामुळे या गतिरोधकावरुन वाहनांचे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. त्यामुळे हा गतिरोधक हटविण्याची मागणी वाहनचालक व स्थानिक नागरीकांनी केली आहे.

जिंदाल कंपनीच्या समोरच दोन ते तीन गतिरोधक टाकण्यात आले आहेत. हे गतिरोधक क्षमतेपेक्षा जास्त उंचीचे असुन त्यांच्यावर मारण्यात आलेले पांढ-या रंगाचे पट्टे दिसून येत नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळेस येणाऱ्या- जाणा-या वाहनांना हे पांढ-या रंगाचे पट्टे दिसत नसल्याने सद्यस्थितीत वाहनचालकांना गतिरोधकाचा अंदाज येत नसल्यामुळे वाहने या गतिरोधकावर जोरात आदळुन बरेच अपघात घडत आहेत. त्याचप्रमाणे वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये दुचाकीस्वार तसेच चारचाकी वाहनांचे याठिकाणी अपघात होऊन अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे अपघाताला आमंत्रण देणारे अंत्यंत धोकादायक गतिरोधक हटविण्याची मागणी येथील जागरूक नागरिक राजेंद्र कोकळे यांनी केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.