नदीच्या पात्राजवळ खड्डे खोदून घोटभर पाणी मिळण्यासाठी धडपड
सिटी बेल • काशिनाथ जाधव •
पाताळगंगा •
उन्हाळा सुरु झाला की पाणी टंचाईचे सावट निर्माण होत असते.यामुळे घोट भर पाणी मिळण्यासाठी जणू धडपड करावी लागत आहे.मात्र पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळतच नाही. विहिर, तळाव,कूपनलिका या सारखे असलेले पाण्याचे स्त्रोत्रांनी तळ गाठण्याच्या तयारी दर्शविली असून,नदिच्या ठिकाणी खड्डे करून या खाद्यामधे पाणी जमा झाले की, ते घरघुती वापराचं ही भीषण स्थिती एप्रिल महिन्यामध्ये निर्माण झाली आहे.
मे महिन्यामध्ये पाणी टंचाईचे सावट अधिक गडद होण्यांची चिन्ह निर्माण झाली आहे.पावसाळ्यात जळाचे असलेले स्त्रोत्र पूर्ण भरत असले,तरी सुद्धा मार्च ,एप्रिल आणी मे महिन्यामध्ये पाण्याचे मृगजळ तयार होत आहे.मात्र पिण्यासाठी पाणी तरी कोठून आणायचं? हा प्रश्न सध्या डोके वर काढत आहे.डोंगराळ आशा दुर्गम भागात राहणारे आदिवासी बांधावांना पाण्यासाठी जणू कसरत करावी लागत आहे.यामुळे पावसाळ्यात वाहणारे डोंगराच्या कडे कपारीतून पाझरणारे पाणी आणी झरे याच अल्प पाण्यावर आपली तृष्णा शांत करावी लागत आहे.
पाणी म्हणजे पृथ्वी वरील सर्व सजिवांचे जीवन,मात्र गेल्या काही वर्षामध्ये तालुक्याच्या ठिकाणी पाणी टंचाईचे ग्रहण लागलेले सुटत नाही.यामुळे यांचा सामना कसा करावा हा प्रश्न सध्या डोके वर काढत आहे.शिवाय या पाण्यासाठी रात्र ही जागावी लागत आहे.मात्र असे असले तरी या कडे साफ दुर्लक्ष केले जाते तालुक्यामध्ये हाताच्या बोटावर मोजेल एवढेच गावातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून,बाकी ठिकाणी मात्र जणू वणवाचं म्हणावे लागेल.








Be First to Comment