सिटी बेल • काशिनाथ जाधव •
पाताळगंगा •
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर मुंबईत झालेल्या भ्याड हल्ल्याचा खोपोली शहर भारतीय जनता पक्षाने निषेध व्यक्त करीत हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी अशा स्वरूपाच्या मागणीचे निवेदन शहर भाजपच्या वतीने खोपोली पोलिस ठाण्यात रविवारी देण्यात आले.
“आपल्यावर हल्ला होणार अशा स्वरूपाची माहिती किरीट सोमय्या यांनी पोलिसांना देण्यात आल्यानंतर ही पोलिसांनी याबाबत कुठलीही ठोस उपाययोजना केली नसल्याचा किरीट सोमय्या यांनी विविध प्रसार माध्यमांशी बोलताना पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. जाणीवपूर्वक व नियोजनबद्ध हा हल्ला होता ,असे सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोप केला, त्यांच्या गाडीवर हल्लेखोरांनी दगड मारल्याने सोमय्या यांच्या गाडीच्या काचा फूटून त्यांच्या चेहऱ्यावरील हनुवटीवर काच लागल्याने रक्तस्राव होत होता या, घटनेबाबत खोपोलीतही प्रतिक्रिया उमटली.
खोपोली भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस हेमंत नांदे, प्रमोद पिंगळे, उपाध्यक्ष रमेश रेटरेकर, कोषाध्यक्ष राकेश दबके, महिला आघाडीच्या सुनिता महर्षी इत्यादी कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्या यांच्या हल्ल्यावरील निषेधाचे पत्र खोपोली पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांना दिले व हल्लेखोरांवर कारवाई करण्याची आग्रही मागणी पण केली.








Be First to Comment