आयआयएफ़एल फायनान्सच्या नागोठणे शाखेचे आमदार रविशेठ पाटील व शिवसेना नेते किशोरभाई जैन यांच्या हस्ते उद्घाटन
सिटी बेल • नागोठणे • महेश पवार •
नागोठण्यातील शांतीनगर भागातील मोनालिसा कॉम्प्लेक्स या इमारती मधील आयआयएफ़एल फायनान्स (गोल्ड लोन) या कंपनीच्या रायगड जिल्ह्यातील आठव्या शाखेचे उद्घाटन आमदार रविशेठ पाटील व शिवसेना नेते किशोरभाई जैन यांच्या हस्ते मंगळवारी (दि.२६) उत्साहात संपन्न झाले.
यावेळी नागोठणे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, भाजपा रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, सरचिटणीस आनंद लाड, भारतीय किसान संघ जिल्हा सचिव प्रमोद लांगी, फायनान्स कंपनीचे मुख्य अधिकारी संतोष भोसले, जिल्हा उपाध्यक्ष श्रेया कुंटे, माजी उपसरपंच विद्यमान सदस्य सुरेशशेठ जैन, शिक्षण सेल तालुका अध्यक्ष अशोक अहिरे, प्रमोद गोळे, प्रियांका पिंपळे, सिराजभाई पानसरे, सुभाष पाटील, राजेंद्र लवटे, ऐनघर उपसरपंच रोहिदास लाड, मोरेश्वर म्हात्रे, शेखर गोळे, कीर्तिकुमार कळस, तिरतराव पोलसानी, भरत गिजे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन फायनान्स कंपनीचे जावेद मुलाणी यांनी केले.

या फायनान्स कंपनीने कर्जदारांना अव्वाच्या सव्वा पद्धतीने व्याजदर न आकारता योग्य प्रमाणात व्याजदर लावा जेणे करून कर्जदार आपले कर्ज वेळेवर भरू शकेल. ग्राहकांना योग्य प्रकारे सहकार्य केल्यास आपली कंपनी फायद्यात राहील. गोरगरीब उद्योजकांचा उद्योग वाढविण्यासाठी योगदान देण्याचे काम करा असा मौलिक सल्ला यावेळी आमदार रविशेठ पाटील यांनी फायनान्स कंपनीच्या अधिकारी वर्गाला दिला. दरम्यान बँक क्षेत्रात परिचय व माणुसकीला फार महत्व आहे. आपण पैसे देण्यासाठी आलेले आहात म्हणून आपल्या फायनान्स कंपनीचे आमच्या नागोठणे शहरात स्वागत आहेच परंतु येथील गरजवंत व्यक्तीस व उद्योजकांना सहज सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध करून द्या असे आवाहन यावेळी शिवसेना नेते किशोरभाई जैन यांनी अधिकारी वर्गाला केले.
हा उद्घाटन सोहळा यशस्वी करण्यासाठी पद्माकर सायगावकर व ओंकार म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी वर्गाने विशेष मेहनत घेतली.








Be First to Comment