प्रजापिता ब्रम्हकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या बाईक रॅलीचे नागोठण्यात उत्स्फूर्त स्वागत
सिटी बेल • नागोठणे • महेश पवार •
व्यसनमुक्ती व व्यसनमुक्तीच्या जनजागृतीसाठी राजस्थान मधीन माउंट आबू येथील प्रजापिता ब्रम्हकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय या अध्यात्मिक संस्थेकडून राजभवन-मुंबई ते रोहा दरम्यान आयोजित “आजादी के अमृत महोत्सव से स्वर्णिम भारत की ओर” या व्यसनमुक्ती व शांततेचा संदेश देणाऱ्या दुचाकी रॅलीचे नागोठण्यात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे १ मार्च, २०२२ रोजी झेंडा दाखवून या बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली होती.

यानिमित्ताने नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता मंदिराच्या प्रांगणातील व्यासपीठावर संपन्न झालेल्या रॅलीच्या सांगता कार्यक्रमात देवस्थान विश्वस्त समितीचे सचिव भाई टके यांच्याकडून बाईक रॅलीत सहभागी झालेल्या प्रजापिता ब्रम्हकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय अध्यात्मिक संस्थेच्या वरिष्ठ बी.के.तारा दीदी, भाऊ-बहिण यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राजिप सदस्य किशोर जैन, रोहा तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. राजेंद्र धात्रक, माजी सरपंच विलास चौलकर, पिगोंडे ग्रामपंचायतीचे सरपंच संतोषभाई कोळी, नागोठणे उपसरपंच मोहन नागोठणेकर, पोलीस उपनिरीक्षक नारायण चव्हाण, प्रथमेश काळे, नागोठणे ग्रा.पं.सदस्य सुरेशशेठ जैन, ज्ञानेश्वर साळुंखे, वांगणी ग्रा.पं. सदस्य प्रमोद जांबेकर, धनंजय जगताप आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

संस्थेच्या पनवेल केंद्राच्या प्रमुख बी.के. तारा दीदी यांनी यावेळी संस्थेचा परिचय व राजयोगाद्वारे सुखमय जीवन याविषयी माहिती दिली. परेल केंद्राच्या प्रमुख बी.के.भावना दीदी यांनी रॅलीचा मुख्य उद्देश राजयोग मेडीटेशनचे महत्व सांगितले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच रिद्धी-सिद्धी ग्रुपने उत्कृष्ट असे स्वागत नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन चुनाभट्टी केंद्राच्या बी.के. सपना दीदी यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या सर्व भाऊ-बहिणींनी सहकार्य केले.
दरम्यान तत्पूर्वी या दुचाकी रॅलीचे नागोठण्यातील छ. शिवाजी महाराज चौकात नागोठण्याचे उपसरपंच मोहन नागोठणेकर व ग्रा.पं. सदस्य सुरेश जैन यांच्याकडून स्वागत करण्यात आले. नंतर संस्थेच्या पनवेल केंद्राच्या वतीने याठिकाणी व्यसनमुक्तीवर प्रबोधनात्मक असे सुंदर पथनाट्य सादर करण्यात आले. यामध्ये संस्थेच्या मुंबई केंद्रातून आलेल्या भाऊ-बहिणी सहभागी झाल्या होत्या. छ. शिवाजी महाराज चौक मध्ये उपस्थित सर्वांनी या पथनाट्याला उस्फुर्त दाद दिली. यावेळी पोलिसांकडून वाहतुकीचे उत्तमरीत्या नियोजन करण्यात आले होते. त्यानंतर ही रॅली बाजारपेठ मार्गे के.एम.जी. विभागात आल्यानंतर माजी सरपंच विलास चौलकर यांनी रॅलीचे स्वागत केले.








Be First to Comment