Press "Enter" to skip to content

पिगोंडेतील विकास कामांचे भुमीपुजन संपन्न

पिगोंडे ग्रामपंचायतीच्या दोन्ही गावांतील रस्ते उच्च दर्जांचे होणार : सरपंच संतोषभाई कोळी

सिटी बेल • नागोठणे • महेश पवार •

पिगोंडे ग्रामपंचायतीच्या हद्दितील सर्वच भागाच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत असून पिगोंडे ग्रामपंचायतीच्या वेलशेत व आंबेघर या दोन्ही गावांतील अंतर्गत रस्ते येत्या काही दिवसांत उच्च दर्जांचे होणार असल्याने या रस्त्यांचे काम सुरु असतांना दोन्ही गावांतील नागरिकांनी त्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन पिगोंडे ग्रामपंचायतीचे सरपंच संतोषभाई जनार्दन कोळी यांनी केले.

नागोठण्याजवळील पिगोंडे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील वेलशेत, आंबेघर व आंबेघर बौद्धवाडी या भागातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे तसेच जिल्हा क्रीडा अंतर्गत शाळेसमोरील मैदान समपातळी करणे या कामांचे भूमिपूजन मंगळवार दि. २६ एप्रिल रोजी सकाळी १०:०० वाजता पिगोंडे येथील बस पार्किंग या ठिकाणी पिगोंडे ग्रामपंचायतीचे सरपंच संतोषभाई कोळी यांचे हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे उपसरपंच नाना बडे, माजी उपसरपंच सखाराम घासे, सदस्य धनाजी दत्तात्रेय पारंगे, शैलेश शेलार सौ.कांचन दिपक माळी, सौ. गिता अनिल पाटील, सौ.रंजना तुषार माळी, सौ.नेत्रा रोशन पारंगे, सौ.कुसुम तुकाराम बावकर, ग्रामसेवक विजय अहिरे, ग्रामस्थ बळीराम बडे, राजेंद्र लवटे, सुधाकर पारंगे, विजय पारंगे, अंकुश पारंगे, रोशन पारंगे, यादव माळी, हरिचंद्र घासे, दयाराम ताडकर, अनिल पाटील, अशोक पाटील, चंद्रकांत कोळी, विठोबा माळी, काळूराम माळी, पुंडलिक ताडकर, मारुती पारंगे, प्रल्हाद पारंगे, महेंद्र तरे, अनंत शेलार, महेश पाटील, बाळाराम ताडकर, लक्ष्मण घासे, सखाराम ताडकर, कृष्णा बावकर, गंगाराम पारंगे, दामोदर बावकर, दशरथ माळी, नथुराम पाटील, देवजी माळी, अल्पेश शेलार, कृष्णा पारंगे आदींसह वेलशेत, आंबेघरचे ग्रामस्थ आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे आभारही यावेळी सरपंच संतोषभाई कोळी यांनी मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.