Press "Enter" to skip to content

आमदार अनिकेत तटकरे यांनी केले स्वागत

वासगाव येथील युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

सिटी बेल • नागोठणे • महेश पवार •

रायगडचे कार्यसम्राट खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री ना. अदितीताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या कार्यप्रणालीवर खुश होऊन पाटणसई ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तथा विभागीय कार्याध्यक्ष सचिन कळसकर व माजी सरपंच झिमशेठ कोकरे यांच्या नेतृत्वाखाली नागोठण्याजवळील पाटणसई ग्रामपंचायत हद्दीतील वासगाव या आदिवासी वाडी परिसरातील अनेक तरुण युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

त्यावेळी तरुणांचे आयकॉन आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी प्रवेशकर्ते तरुण कार्यकर्त्यांचे स्वागत करून तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मानसन्मानाने वागणुक दिली जाईलच तसेच तुमचा रोजगाराचा प्रश्न देखील साहेब व ताई यांच्या मार्गदर्शनाने मी निश्चितच सोडविण्याचा प्रयत्न करीन असे आश्वासन आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी प्रवेशकर्त्या तरुण कार्यकर्त्यांना दिले.

दरम्यान चंद्रकांत बावदाने, मंगेश बोडेकर, प्रकाश बोडेकर, संतोष बोडेकर, राम बावदाने, हरेश झोरे, चिंतामण बावदाने, लक्ष्मण बावदाने, लक्ष्मण नारायण बावदाने, मंगेश बोडेकर, मोरू हंबीर यांच्यासह अनेक तरुण कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

वासगाव येथे पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, जि.प. च्या माजी सदस्या सखुबाई पिंगळा, झिमाशेठ कोकरे, बाळासाहेब टके, सचिन कळसकर, विनय गोळे, हरेश कोकरे, दिनेश घाग, केतन भोय जानू कोकरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.