Press "Enter" to skip to content

मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा

नागोठण्यातील इफ्तार पार्टीत आम. अनिकेतभाई तटकरे यांनी घेतला सहभाग

सिटी बेल • नागोठणे • महेश पवार •

नागोठणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य अखलाक पानसरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिनाच्या अनुषंगाने अखलाक पानसरे यांनी त्यांच्या बंगल्यावर इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या इफ्तार पार्टीत तरुणांचे आवडते आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी सहभाग घेऊन इफ्तार पार्टीतील विविध पदार्थांसह फळफळावरचांही आस्वाद घेऊन उपस्थित मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या.

दरम्यान यावेळी आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी अखलाक पानसरे यांना खजूर भरवून त्यांचा रोजा सोडविला. त्यानंतर आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी अखलाक पानसरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर इफ्तार पार्टीची सांगता झाली. दरम्यान युवा नेते अखलाक पानसरे मित्रमंडळांनी अन्वर पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली या इफ्तार पार्टीचे नियोजन अतिशय उत्कृष्ठ व नियोजनबद्ध पद्धतीने आयोजन केले होते. या इफ्तार पार्टीत हिंदू मुस्लिम बांधवांनी सहभागी घेऊन नागोठण्यात हिंदू मुस्लिम समाजाचे ऐक्य दाखवुन दिले असल्याची भावना यावेळी माजी सरपंच लियाकतशेठ कडवेकर यांनी व्यक्त केली.

या इफ्तार पार्टीला आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या समवेत राष्ट्रवादीचे विभागीय नेते भाई टके, माजी सरपंच लियाकतशेठ कडवेकर, रियाजशेठ अधिकारी, अखलाक पानसरे, रोहा पं.स.चे माजी सदस्य डॉ. राजेंद्र धात्रक, पेण विधानसभा मतदार संघ उपाध्यक्ष विलास चौलकर, विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी, कार्याध्यक्ष सचिन कळसकर, विनय गोळे, प्रमोद जांबेकर, जहुरुद्दीन सय्यद, रोशन पारंगे, जिशान सय्यद, काजिम पानसरे, उमेर सांगडे, अन्वर पानसरे, महिला आघाडीच्या आशा शिर्के, रिचा धात्रक, सुजाता जवके, प्रतिभा तेरडे, सुनील लाड, दिनेश घाग, रोहिदास हातनोलकर, रवि वाजे, मनोज टके, चेतन टके, धृव सोष्टे, कुणाल तेरडे, प्रथमेश काळे, डॉ. सनी धात्रक, केतन भोय, प्रकाश रेवाळे, अक्षय नागोठणेकर, घनश्याम ताडकर, नामदेव ताडकर, जगदीश दिवेकर आदींसह मुस्लिम समाज बांधव व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. दरम्यान या इफ्तार पार्टीला नागोठणे पोलिस ठाण्याचे पो. नि. तानाजी नारनवर यांनीही आवर्जून भेट दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.