केंद्रिय रेल्वे सल्लागार समिती सदस्य अभिजित पाटील यांना निवेदनाद्वारे साकडे
सिटी बेल • पनवेल •
पनवेल ते पळस्पे दरम्यान असणारा काळुंद्रे रेल्वे पुलाखाली वाहतुकीची कोंडी न होण्याबाबत योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पनवेल ते पळस्पे दरम्यान असणारा काळुंद्रे येथील रेल्वे पुल खाली सखोल भाग असल्याने गटारातील पाणी पूर्णपणे रस्त्यावर जमा होते परिणामी राष्ट्रीय महामार्ग NH-48 मार्गावर पावसाळ्यामध्ये वाहतुकीची कोंडी होऊन पूर्णपणे वाहतूक ठप्प होते.

तरी या भरपूर वर्षांपासूनच्या प्रलंबित विषयाचा गांभीर्याने विचार करून समस्येचे लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेच्या वतीने केंद्रिय रेल्वे सल्लागार समिती सदस्य भारत सरकार अभिजित पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे साकडे घालण्यात आले आहे.
यावेळी सुदाम दादा पाटील ( राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव ), गणेश थोरवे (पश्चिम महाराष्ट्र सचिव, पोलिस सेवा संघटना), सागर कुरंगळे (रायगड जिल्हा उपाध्यक्ष,पोलिस सेवा संघटना) उपस्थित होते.









Be First to Comment