काजल भामरे देसाई ठरली सन 2022 ची मिसेस इंडिया
सिटी बेल • जयपूर • राकेश खराडे •
एएसव्ही प्रोडक्शन आयोजित मिस्टर अँड मिसेस राॅयल स्टार इंडिया या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत काजल भामरे- देसाई ठरली मिसेस राॅयल इंडिया 2022ची महाविजेती.
हि स्पर्धा जयपूर येथे पार पडली. या स्पर्धेत विविध राज्यातील एकुण 42 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.यातून महाराष्ट्रातून काजल हिने या टॅलेट राउंड / प्रश्नोत्तर राऊड यात आपल्या परिक्षकाची मन जिंकुन मिसेस इंडियाचा मुकूट पटकावला आहे .
या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून बिग बाॅस फेम डोनल बिस्ट आल्या होत्या . त्यांच्याहस्ते राष्ट्रीय स्तरावर महाविजेती चार मुकूट काजल ला परिधान करण्यात आला. काजलचे पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याचे मानस आहे .








Be First to Comment