Press "Enter" to skip to content

पेण प्रांताधिकारी कार्यालय येथे उपोषण

निगडे हद्दीतील बौद्ध समाजाची राखीव जागा मिळण्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण

सिटी बेल • पेण • वार्ताहर •

पेण तालुक्यातील निगडे हद्दीतील गट नंबर, सर्वे नंबर ४८ येथील जवळपास ३ ते ४ एकर जागा अनेकांनी अनाधिकृतपणे हडप केली आहे ती जागा बौद्ध समाजाला तात्काळ देण्यात यावी या मागणीसाठी निगडे गावातील ग्रामस्थांनी पेण प्रांताधिकारी कार्यालय येथे उपोषण सुरू केले आहे.

मागच्या अनेक काळापासून सदर जागा बौद्ध समाजाची असून आजही गाव नकाशात ही जागा बौद्ध समाजाच्या नावांवर आहे.मात्र येथील अनेक कुटुंब आपल्या उदरनिर्वाहासाठी बाहेर गावी गेले असल्याचे पाहून या जागेवर अनेकांनी अनाधिकृतपणे घरे बांधलेली आहेत. त्यामुळे आमच्या हक्काची जागा आम्हाला मिळावी याकरिता वारंवार शासनाकडे पत्रव्यवहार केले परंतु याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने अखेर बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली असणा-या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तालुकाध्यक्ष देवेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली निगडे ग्रामस्थांनी उपोषणास सुरुवात केली आहे. जर आमच्या हक्काची जागा आम्हाला मिळाली नाही तर येणार्‍या काळात यापेक्षाही उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.