सिटी बेल • याकूब सय्यद • नागोठणे •
पेण पाली सुधागड मतदारसंघाचे आमदार रवींद्र पाटील यांच्या स्थानिक आमदार विकास कार्यक्रम अंतर्गत नागोठणे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा आमदार रवींद्र पाटील यांच्या शुभहस्ते व जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांच्या अध्यक्षतेखाली व पंचायत समिती सदस्य बिलाल कुरेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी नागोठणे ग्रामपंचायतीचे सरपंच मिलिंद धात्रक, उपसरपंच मोहन नागोठणेकर, ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
यावेळी नागोठणे गावातील डॉक्टर कुंटे, शैलेंद्र देशपांडे घराच्या समोर असलेले रस्ते त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे पाच लाख, श्री दत्त मंदिर व चांदणी फ्लोर मिल समोर रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे चार लाख, जोगेश्वरी नगर नाळयाला संरक्षण भिंत बांधणे पाच लाख, हिंदूहृदय सम्राट बाळा साहेब ठाकरे नगर अंतर्गत रस्ता करणे तीन लाख, आझाद मोहल्ला अंतर्गत रस्ता तयार करणे पाच लाख, खुमाचा नाका ते मस्जिद अंतर्गत रस्ता तयार करणे पाच लाख, उर्दू शाळेच्या पाठीमागे मोठा नाळा बांधणे पाच लाख, बँक ऑफ इंडिया समोर रस्ता तयार करणे तीन लाख, अंगार काळी क्रॉस ड्रोन करणे पाच लाख असे लोकार्पण व भूमिपूजन विविध विकास कामांचे सोहळा थाटात संपन्न झाला. त्यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment