Press "Enter" to skip to content

एक उमेदवार बिनविरोध तर नऊ पैकी आठ उमेदवार भरघोस मतांनी विजयी

लोकमान्य सोसायटीच्या निवडणुकीत उद्योजक राजू पिचिका यांच्या पॅनलचा दणदणीत विजय

सिटी बेल • पेण • वार्ताहर •

पेण शहरातील सर्वात जुनी व नावाजलेल्या लोकमान्य हौसिंग सोसायटीच्या निवडणुकीत उद्योजक राजू पिचिका यांच्या पॅनलने दणदणीत विजय संपादन केले आहे. नऊ उमेदवारांपैकी आठ उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले असून एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. सोसायटीच्या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळाल्याबद्दल उद्योजक राजू पिचिका यांनी मतदारांचे जाहीर आभार मानले.

पेण येथील लोकमान्य हौसिंग सोसायटी 1965 साली स्थापन झाली आहे. या सोसायटीत 70 प्लॉट धारक आहेत. चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत 70 मतदारांपैकी 48 मतदारांनी आपल्या मतदानाचे हक्क बजावले. उद्योजक राजू पिचिका यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली स्वतः राजू पिचिका यांना 36 मते, उल्हास वाड यांना 32 मते, स्मिता वैशंपायन यांना 29 मते , महेंद्र मोहिते यांना 37 मते, सतीश म्हात्रे यांना 35 मते, प्रज्ञा जोशी यांना 32 मते, सीताराम धाऊ पाटील यांना 33 मते व हरेश शहा यांना 30 मते मिळाली.

राजेश म्हात्रे यांच्या समोरील उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने म्हात्रे हे उमेदवार ओबीसी गटातून बिनविरोध निवडून आले होते. तर प्रतिस्पर्धी गटातील प्रकाश वखरे, करुणा पाटील, सुजाता पाटील या तीन उमेदवारांचा पराभव झाला. या निवडणुकीत राजू पिचिका गटाचे एकूण नऊ पैकी नऊ उमेदवार निवडून आले आहेत. अरुण चौधरी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

यावेळी बोलताना उद्योजक राजू पिचिका यांनी सांगितले की, यापुढेही सोसायटीच्या विकास कामात आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत. आणि सोसायटीच्या विकास कामात कोणतेही राजकारण न आणता आम्ही सर्वांची कामे करणार आहोत. तसेच सर्व मतदार यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या पॅनलला निवडून दिल्या बद्दल राजू पिचिका यांनी सर्वांचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.