सिटी बेल • पनवेल • संजय कदम •
82,50,000/- रुपयाने भरलेली व्हॅन घेवून पसार झालेल्या आरोपीस अवघ्या 24 तासात एनआरआय पोलीस ठाण्याने ताब्यात घेतले असून सदर आरोपीकडून 81 लाख 41 हजार 800 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर अटक आरोपीचे नाव संदिप शरद दळवी, वय- 36 वर्षे, धंदा चालक रा.कोपरखैरणेगांव हे असून त्याने त्याच्या ताब्यातील महींद्रा कंपनीची बोलेरो गाडी क्रमांक एमएच 43-एडी-6393 मध्ये असलेले 2,29,50000/-( दोन करोड एकोणतीस लाख पन्नास हजार रूपये ) घेवुन जासई, धुतुम, पिरकोन, नवघर, चारफाटा उरण, करंजा, गव्हाण येथिल विविध बॅकाच्या एटीएम मशिनमध्ये पैसे टाकुन उलवा, बामणडोंगरी रेल्वे स्टेशन समोरील बॅक ऑफ इंडीया च्या एटीएम मषिनमध्ये पैसे टाकण्यासाठी संध्याकाळी 08ः20 वा. सहकार्यांसह पोहचला.
त्यावेळी त्याचे सहकारी असे पैसे घेवुन एटीएम मशिनमध्ये पैसे टाकत होते. त्यावेळी गार्ड महेश भास्कर हा एटीएम मशिनच्या बाहेर उभा होता. आरोपी संदिप दळवी हा गाडीतच होता. एटीएम मशिन पासुन गाडी सुमारे 50 मीटर अंतरावर उभी होती. फिर्यादी व सहकारी गार्ड सह एटीएम मशिनमध्ये पैसे टाकुन 10 मिनिटांनी बाहेर आले असता त्यांनी गाडीची आजुबाजुला पाहणी केली असता त्यांनी गाडी दिसुन आली नाही.
त्यावेळी त्यांनी आजुबाजुला शोध घेवुन जी पी एस वर पाहिले असता. गाडी पारसिक हिल येथे असल्याबाबत समजले. त्यावेळी कंपनीने पोलीस नियंत्रण कक्षास माहीती दिली व फिर्यादी व त्यांचे सहकारी तात्काळ अपोलो हॉस्पिटल पारसिक हिल येथे पोहचले असता. त्याठिकाणी पोलीस ही पोहचले होते. परंतु गाडीचा चालक व गाडीतील पैशांची पेटी मिळुन आली नाही. त्यावरून गाडी वरील चालक आरोपी दळवी याने बोलेरो गाडी क्रमांक एमएच 43-एडी-6393 मध्ये असलेले 82,50000/- रुपयाची चोरी करुन पळुन गेला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील आरोपी चा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली होती आरोपीचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नव्हते, गुन्ह्यातील साक्षीदार यांच्याकडे चालक हा बदली चालक असल्याने काही एक माहीती नव्हती. त्यामुळे ज्या अतुल मामुनकर यांच्या ओळखीने तो आला होता. त्यांच्याकडे ही खात्री केली परंतु त्याच्याकडे ही आरोपी हा फक्त कोपरखैरणे येथे राहतो एवढीच माहीती होती. व एक बंद फोन नंबर होता. त्या फोन नंबर बाबत लोकेशन मिळत नव्हते परंतु तांत्रिक व सोशल मिडीयावरून आरोपीचा फोटो प्राप्त करून गोपनिय बातमीदाराला दाखवुन आरोपीच्या ठाव ठिकाण्याबाबत सपोनि केकान, पोउपनिरी मंगेष बाचकर, पोउपनि संदेष तांबे व पोलीस पथक यांनी वेळोवेळी माहिती घेवुन अविरत पणे 24 तास शोध घेवुन त्यास पनवेल बस स्टॅन्ड येथुन शिताफिने ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास अटक करण्यात आली आहे.
यातील अटक आरोपी यांनी चोरी केलेल्या पैशापैकी एकुण 81,41,800/-रू. जप्त करण्यात आले आहेत. गुन्हयातील चोरी केलेल्या रकमेपैकी काही रक्कम खर्च करून उर्वरित रक्कम व पैशांची पेटी ही त्याचे मित्राच्या घरी घरचे सामान आहे असे सांगून त्यास लॉक करून ठेवली होती.
सदरची उत्तम कामगिरी पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, सह पोलीस आयुक्त जय जाधव यांचे आदेषान्वये पोलीस उप आयुक्त परि 01, विवेक पानसरे, सहा. पोलीस आयुक्त गजानन राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे पृथ्वीराज घोरपडे यांचे मार्गदर्शनाखाली एनआरआय पोलीस ठाण्याचे सपोनि केकाण, पोउपनि बाचकर, पोउपनि संदेश तांबे, पोहवा पाटील, पोहवा पाटील, पोना देवरे, पोना फंड, पोना तांडेल, पोना लेडघर, पोना वाघमारे, पोना चव्हाण, पोना बेलोटे, पोशि सोनवणे, पोशी कदम यांनी केलेली आहे.
Be First to Comment