पनवेल तालुका महिला पत्रकार विकास मंच आयोजित “तो मधील ती चा प्रवास”
सिटी बेल • पनवेल • वार्ताहर •
पनवेल तालुका महिला पत्रकार विकास मंच यांच्यातर्फे दि.8 मे 2022 रोजी रात्री 8.30 वाजता आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे तो मधील ती चा प्रवास (फॅशन शो) एलजीबीटीक्यू (तृतीयपंथी) समुदाय एकत्रीकरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास महंत शिवलक्ष्मी आईसाहेब संजय झाल्टे (मनमाड) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्ताने प्रतिष्ठीत मान्यवरांचे सन्मान व समाजप्रबोधन करण्यात येईल अशी माहिती अध्यक्षा सुमेधा लिम्हण, सचिव आदिती ढवळे, उपाध्यक्षा कोमल डांगे, सदस्य दिपाली पारस्कर व नुतन पाटील यांनी दिली.








Be First to Comment