Press "Enter" to skip to content

पनवेल शहर पोलीसांची कारवाई

महागडया मोटार सायकल चोरी करणारे सराईत गुन्हेगार पनवेल शहर पोलीसांकडुन जेरबंद

सिटी बेल • पनवेल • संजय कदम •

पनवेल परिसरातून मोटारसायकल सह इतर वाहने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी गजाआड करून त्याच्या कडून एकुण- ९,००,०००/- रू. कि. मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.

समीर ज्ञानेश्वर पाटील, वय २६ वर्षे, रा. मु. पो. कोल्ही कोपर, ता. पनवेल, यांनी त्यांची ५०,०००/- रुपये किंमतीची यामाहा कंपनीची R15 मॉडेलची मोटार सायकल कमांक एम. एच. /४६/ बी.जे./ ९०७४ हि मु. पो. भंगारपाडा, घर नंबर १३४, ता. पनवेल, याठिकाणी पार्क करून ठेवली असत ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून नेली म्हणुन फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पनवेल शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नमुद गुन्हयाचा तपास करत असतांना गुप्त बातमीदार तसेच तांत्रीक तपासाच्या मदतीने पनवेल शहर पोलीस ठाणे येथील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयातील आरोपी कौशल श्रीरंग पाटील, रा.ठि. मु. पाणदिवे, पो. कोपरोली, जि. रायगड यास पोलीस ठाण्यात आणुन त्याचेकडे कौशल्यपुर्ण व अचुकपणे गुन्हयासदर्भात चौकशी केली असता नमुद गुन्हयातील चोरीस गेलेली मोटार सायकल तसेच त्याचे चोरी केलेल्या इतर पाच मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

तसेच मोटार सायकल चोरी करण्याकरीता आरोपीने वापरलेला महिंद्रा कंपनीची टेम्पो हस्तगत करण्यात आला. तसेच आरोपीकडुन तीन लाख रूपये कि.च्या तीन R15 मोटार सायकल एक लाख रूपये कि.ची बुलेट, एक लाख रूपये कि.च्या दोन मोपेड मोटार सायकल व चार लाख रूपये कि. चा टेम्पो, व असे एकुण – ९,००,०००/- रू. कि. मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.

वरील कामगीरी . पोलीस आयुक्त बी. के. सिंग, . सह. पोलीस आयुक्त डॉ. जय जाधव, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-०२ पनवेल शिवराज पाटील,. सपोआ. भागवत सोनवणे, पनवेल विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर पोलीस ठाणे, विजय कादबाने, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) संजय जोशी, व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, गणेश दळवी, पोउपनि अभयसिंह शिंदे, पो.हवा अविनाश गंथडे, पो.हवा नितीन वाघमारे, पो.ना अशोक राठोड, पो ना महेश पाटील, पो.ना भगवान सांळुके, पो. शि संतोष मिसाळ यांनी केलेली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.