कमल कोठारी यांच्या नेतृत्वाखाली कळंबोलीत मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी
आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतले बजरंगबलीचे दर्शन
सिटी बेल • कळंबोली • प्रतिनीधी •
“अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान”, “संकट मोचन जय हनुमान” यांसारखी भक्तीगीते आणि चहुकडे घुमणारा हनुमान चालिसा, महामंत्र अशा भक्तीपूर्ण वातावरणात कळंबोली शहरात आज शनिवारी ( दि. 16 ) हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .
पहाटे पाच वाजता भाजपा व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कमल कोठारी यांच्या हस्ते बजरंग बळींचा महाअभिषेक करण्यात आला. दुपारी १२ ते ३ सुंदर कांड वाचन, भजन, सायंकाळी ४ वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद वाटपाचे कार्यक्रम घेण्यात आले . शहरांसह गावातील हनुमान मंदिरांना विद्युत रोषणाई केली होती. पहाटे पाच वाजल्यापालून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती . सकाळी होमहवन , अभिषेक , हनुमान चालिसा , महामंत्र आणि महाआरती यासारखे धार्मिक कार्यक्रम झाले .
दर्शनासाठी लागलेल्या रांगा , प्रसाद वाटपासाठी कार्यकर्त्यांचे चाललेले प्रयत्न , भाविकांकडून हनुमानाच्या नावाचा होणारा जयघोष असे भक्तीपूर्ण वातावरण मंदिराच्या परिसरात होते .
संकटमोचन हनुमानाच्या मिरवणूक सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर, माजी स्थायी समिती सभापती, नगरसेवक अमर पाटील, नगरसेवक बबन मुकादम, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविशेठ पाटील, बबन बरागाजे, महीला भाजपा नेत्या प्रिया मुकादम, संतोष मोकल, यांच्यासह मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.
Be First to Comment