Press "Enter" to skip to content

शासनाचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

रोह्यात व वरसेत लिंगायत समाजाला दफभूमीची आवश्यकता

सिटी बेल • गोवे-कोलाड • विश्वास निकम •

रोहा शहरासह वरसे ग्रामपंचायतीच्या हद्दीत मोठया प्रमाणात लिंगायत, जंगम,गुरव समाज रहात असून समाजातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांचे दफन करण्यासाठी दफनभुमी नसल्याने समाज बांधवांना नाहक त्रास होत आहे.लिंगायत समाज बांधवांना गाव तिथे दफनभुमी शासनाचा परीपत्रक असतानाही शासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने लिंगायत समाज बांधवाना दफनभूमी मिळत नाही‌.

रोहा शहर व लगत असलेल्या वरसे ग्रामपंचायतीच्या हद्दीत भुवनेश्वर व परीसरात लिंगायत वाणी, लिंगायत कुंभार, लिंगायत जंगम, लिंगायत गुरव यासह अन्य लिंगायत समाजाच्या पोटजाती चे लोक रहातात.या समाजातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांना लिंगायतांच्या विधीनुसार दफन करावे लागते. तालुक्यातील ग्रामीण भागातून, कामानिमित्ताने अन्य जिल्ह्यांतून व अन्य राज्यांतून मोठया प्रमाणात रोहा शहर,वरसे ग्रामपंचायतीमध्ये लिंगायत समाजाचे लिंगायत गुरव, जंगम यासह अन्य लिंगायत समाजातील समाज बांधव स्थायीक झाले आहेत.

रोहा शहर व वरसे ग्रामपंचायतीच्या हद्दीत लिंगायत,गुरव, जंगम समाज व अन्य लिंगायत समाजातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास विधीनुसार दफन करण्यासाठी दफनभुमी नसल्याने त्यांना मृतदेह दफन करण्यासाठी आपल्या मुळ गावी,अन्य जिल्ह्यांत,अन्य राज्यांत घेवुन जावे लागते.या दरम्यान समाज बांधवांना मोठा त्रास सहन करावा लागतो.गरीब समाज बांधवांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

शासनाचे लिंगायत वस्ती तिथे दफन भुमी परीपत्रक असतानाही रोहा शहरात व वरसे ग्रामपंचायतीच्या हद्दीत लिंगायत समाज बांधवाना दफनभूमी मिळत नाही.ही मोठी शोकांतिका असून या महत्त्वाच्या व जिव्हाळ्याचा विषयाकडे शासनाचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे.यापुढे शासनाने अथवा लोकप्रतिनिधींनी या समस्या कडे लक्ष न घातल्यास लिंगायत समाज बांधव आंदोलनाचा पवित्रा घेणार आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.