सिटी बेल • श्रीवर्धन • केतन माळवदे •
तालुक्यातील मौजे खरगाव कोंडवील बौद्धजन ग्राम सेवा समिती आणि महिला मंडळ स्थानिक / मुंबई
आणि आनंदवन युवक सामाजिक कला क्रीडा मंडळ खारगाव येथील आनंदवन बुध्दाविहारात महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीच्या अनुषंगाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळ्याची प्रतिष्ठापणा करण्यात आली.

सदर पुतळा मंडळाचे अध्यक्ष श्री. रवींद्र बा. मोहिते (सेवा निवृत्त झोनल मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र) आणि संपूर्ण मोहिते परिवाराकडून दान देण्यात आली.सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीवर्धन पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर , तसेच ग्रुप ग्रामपंचायत खरगाव च्या सरपंच मोतरमा दिलनवाज मुखातर सोंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी भन्ते मेत्ता धम्म थेरो यांनी धम्म देसना दिली तर संस्थेचे माजी अध्यक्ष गो. बा. खैरे यांच्या कडून विहारासाठी पुस्तके दान दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील लोखंडे यांनी केले.
आभार प्रदर्शन दयानंद तांबे यांनी केले. मीनल मोहिते व किमया मोहिते यांनी आपली मनोगते व्यक्त केली.








Be First to Comment