Press "Enter" to skip to content

इको कार चोरणारी टोळी गजाआड

तमिळनाडू राज्यातून ५४ लाख किमंतीच्या ९ मारुती सुझुकी इको कार हस्तगत

सिटी बेल • पनवेल • संजय कदम •

पनवेल, कामोठे, खारघर, रबाळे, कोपरखैरणे, परिसरातून सन २०२१ मध्ये मारुती इको कार चोरीस गेल्या होत्या. तसेच मुंबई आयुक्तालय व ठाणे आयुक्तालय हददीतून देखील मारुती इको कार चोरीस गेल्या होत्या. सदर गाड्या गुन्हे शाखा कक्ष 1 ने आरोपिंसह हस्तगत केल्या आहेत. तमिळनाडू राज्यातून एकुण ५४,००,०००/-रू किमंतीच्या ०९ मारुती सुझुकी इको कार हस्तगत करून एकूण १२ गुन्हयांची करण्यात आली आहे.

नवी मुंबई गुन्हे शाखा, कक्ष-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, पोना शशीकांत जगदाळे, पोना निलेश किंद्रे, पोशि आशिष जाधव व पोशि विशाल सावरकर या पथकाने नमूद गुन्हयाचे घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहण्यास सुरुवात करून, नमूद गुन्हयातील मारुती इको कार ही रबाळे दिवागाव सर्कल, ऐरोली टोल नाका, पुढे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेने भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, कामराजनगर, सांताकुझ, चेंबूर जोडरस्ता, कुर्ला, बिकेसी एमटीएनएल अशी गेल्याची उपलब्ध खाजगी व सरकारी साधन सामुग्रीच्या साहायाने निष्पन्न करून, पुढे सदरची चोरीची कार ही पुन्हा वाशी टोल नाका या ठिकाणाहून गेल्याने वपोनि शिंदे यांनी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांचेकडून मिळालेल्या तांत्रिक माहितीनुसार एका आरोपीचा संपर्क क्रमांक प्राप्त करून त्याचे तांत्रिक विश्लेषण करून, आरोपींनी एकमेकांशी केलेले आर्थिक व्यवहार व सर्व आरोपीतांचे संपर्क क्रमांक यावरून नमूद गुन्हयात चार आरोपी असल्याचे निष्पन्न करून त्यापैकी एक ओला कॅब चालक असल्याचे निष्पन्न करून मुंबई मेट्रोपॉलीटन परिसरातून १२ मारुती इको कार चोरल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न केले.

त्यानंतर गुन्हयातील पाहीजे आरोपी यांना पकडण्यासाठी दोन पथके वपोनि. सुनिल शिंदे, सपोनि. हर्षल कदम व पथक तसेच सपोनि. निलेश पाटील, सपोनि. आर. एम. तडवी व पथक अशी तयार करून तपास केला. यातील पथक क्र. १ यांनी आरोपी नामे उस्मान सय्यद व शहानवाज शेख यांना सतत पाच ते सहा दिवस अहोरात्र परिश्रम करून कुर्ला व पनवेल परिसरातून शिताफीने अटक केली.

तसेच पथक क्र. २ यांनी तीन ते चार दिवस अहोरात्र आरोपी अब्दुल सलाम शेख यास जरीमरी झोपडपटटी, कुर्ला परिसरातून अटक केली आहे. नमूद आरोपी अटक केल्यानंतर तीनही अटक आरोपी यांची १४ दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेवून यातील अटक आरोपी उस्मान सय्यद याचेसह वपोनि, सुनिल शिंदे, सपोनिक पोहा विश्वास पवार, पोना शशीकांत जगदाळे, पोना निलेश किंद्रे, पोशि आशिष जाधव, पोशि विशाल सावरकर या पथकाने तामिळनाडू राज्यामध्ये जावून खाजगी तामिळ दुभाषिक (ट्रान्सलेटर) चेन्नई, कोइंबतूर, वेल्लोर, सेलम, त्रिची, तुतीकोरीन, तिरुचिरापल्ली व मदुराई या भागात सतत १० दिवस तपास करून आरोपी यांनी चोरी केलेल्या एकुण ०९ मारुती इको कार हस्तगत करून नवी मुंबई आयुक्तालय ०४, मुंबई आयुक्तालय ०६ व ठाणे शहर आयुक्तालय ०२ असे एकूण १२ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

गुन्हयाचे तपासात अटक आरोपी यांनी कट रचून सदरचा गुन्हा केला असून आरोपींनी चोरी केलेल्या मारुती इको कार यांचे मूळ आरटीओ क्रमांक, इंजिन नंबर तसेच चेसीस नंबर नष्ट करून कारची मूळ ओळख पटविता येवू नये याकरीता पुरावा नष्ट केल्याचे तसेच बनावट नंबर प्लेटचा वापर केल्याचे निष्पन्न झाल्याने नमूद गुन्हयात भादवि कलम १२० (ब), २०१, ४६८, ४७१, ४७२, ३४ वाढ करण्यात आली आहे.

नमूद गुन्हयातील अटक आरोपी अब्दुल सलाम शेख व पाहीजे आरोपी रहिम खान हे मारूती इको कार चोरी करण्यासाठी टेहळणी करून कारचे इंधन लॉक काढून त्याद्वारे कारची डुप्लीकेट चावी बनवायचे व कार चोरी करून तिची नंबर प्लेटमध्ये बदल करून कारचे बाहेरील ओळखीच्या खुणा नष्ट करायचे. त्यानंतर आरोपी उस्मान सय्यद व शहानवाज शेख असे चोरलेली कार ही तामिळनाडू राज्यात नेवून आरोपी उस्मान सय्यद हा तेथील त्याचे ओळखीचे कार विक्री करणा-या ब्रोकर यांचे माध्यमातून चोरलेल्या कारची विक्री करत असत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.